Sunday, June 16, 2024
Homeताज्या घडामोडीSchool Time Change: राज्यातील प्राथमिक शाळांचा वेळ बदलणार; राज्य सरकारने काढला जी...

School Time Change: राज्यातील प्राथमिक शाळांचा वेळ बदलणार; राज्य सरकारने काढला जी आर…

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०८ फेब्रुवारी २०२४:- School Time Change: राज्यातील चौखीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ वाजता नंतर भरवा, असा जीआ महाराष्ट्र सरकारने काढला आहे. राज्य सरकारने सर्व शाळांना सूचना दिल्या आहेत. मुलांच्या मानसिक स्वास्थासाठी सरकारने हा निर्यण घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी एका भाषणात राज्यपालांनी शाळेच्या वेळा बदलण्याच्या सूचना दिल्या होत्या. शालेय शिक्षण मंत्र्यांनी याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले होते. दरम्यान सरकारने आता निर्णय घेतला आहे.

आधी प्राथमिक शाळा सकाळी सात वाजता सुरु व्हायच्या. यामुळे विद्यार्थ्यांची झोप होत नव्हती. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या स्वास्थावर होत होता. त्यामुळे सरकारने आता शासन निर्णय काढला आहे.

मुलांना झोपण्यासाठी जास्त वेळ लागतो. राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात सुरू असलेल्या ६५ हजारांहून अधिक सरकारी शाळांमध्ये होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित आणि खाजगी अशा एकूण १,१०,११४ शाळा आहेत.

राज्यपाल रमेश बैस काय म्हणाले होते?

“अलीकडच्या काळात प्रत्येकाची झोपण्याची पद्धत बदलली आहे. मुले मध्यरात्रीनंतरही जागे राहतात पण शाळेसाठी लवकर उठावे लागते. यामुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने शाळेच्या वेळा बदलण्याचा विचार केला पाहिजे,” असे बैस यांनी 5 डिसेंबर रोजी एका मेळाव्याला संबोधित करताना सांगितले.

शासनाच्या जीआरमध्ये काय म्हटलं?

राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळा विशेषतः खाजगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी ७ नंतर असल्याचे दिसून येते.

आधुनिक युगातील बदलेली जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, शहरातील उशिरापर्यंत सुरु असलेल्या ध्वनिप्रदूषण उदा. वाहनांचा आवाज, विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजविले जाणारे कर्कश संगीत इ. अशा अनेकविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे.

पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात.

सकाळी लवकर शाळा असल्याने विद्यार्थ्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात. त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो. ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतो.

मोसमी हवामान, विशेषता हिवाळा व पावसाळा या ऋतू मध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे, पावसामुळे व थंडी मुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो. ते बहुदा आजारी पडतात.

सकाळी पाल्याला लवकर तयार करणे, जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढाताण होते,

सकाळी लवकर भरणान्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅन द्वारे नेताना रस्त्यावरील धुके, पाऊस यामुळेही अडचणी निर्माण होतात.

यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे, अन्यथा शहरी भागात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

यानुसार शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्याथ्यर्थ्यांसाठी दुस-या सत्राचा विचार करावा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!