Saturday, June 15, 2024
Homeराजकीयचिन्ह तुम्हारा, बाप हमारा आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाची कुठं बॅनरबाजी?

चिन्ह तुम्हारा, बाप हमारा आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाची कुठं बॅनरबाजी?

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०७ फेब्रुवारी २०२४:- केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीसंदर्भातील निकाल जाहीर केला. यानुसार राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाकडे गेलंय. यानंतर शरद पवार गटाकडून अजित पवारांवर आणि निवडणूक आयोगावर एकच टीकास्त्र डागण्यात येतंय.

निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाकडून अनेक ठिकाणी बॅनरबाजी केल्याचे पाहायला मिळत आहेत. बलार्ड पियर मधील राष्ट्रवादी भवनासमोर शरद पवार यांचा फोटो असलेले बॅनर्स शरद पवार गटाकडून झळकवण्यात आलेत. साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, चिन्ह तुम्हारा, बाप हमारा… आणि जीत तो आज भी हमारी… अशा आशयाचे बॅनर एनसीपी कार्यालयासमोर लावण्यात आलेत. बघा कोणकोणत्या बॅनर्सची होतेय चर्चा…

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!