अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०७ फेब्रुवारी २०२४:- सीसीआय’तर्फे ठिकठिकाणी कापूस खरेदी सुरू अकोला, दि. ७ : भारतीय कापूस महामंडळातर्फे (सीसीआय) विभागातील १० केंद्रांवर एफएक्यू प्रतीच्या कापसाची किमान हमी दराने कापूस खरेदी सुरू आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी बांधवांनी सीसीसीआयच्या नजिकच्या केंद्रावर कापूस विक्री करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महामंडळामार्फत अकोला जिल्ह्यात अकोट, अकोट ब, बार्शिटाकळी, चिखलगाव, हिवरखेड, मूर्तिजापूर, पारस, तेल्हारा व वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर व अनसिंग अशा 10 केंद्रावर खरेदी सुरू आहे. त्याचप्रमाणे, महामंडळातर्फे चोहोट्टा बाजार येथेही केंद्र उघडण्यात येत आहे, अशी माहिती पणन महासंघाच्या विभागीय व्यवस्थापकांनी दिली.