Wednesday, October 9, 2024
Homeब्रेकिंगस्टेअरिंग लॉक झाल्याने एसटी पलटी घटनास्थळी जमलेल्या लोकांना अपघात पाहून घाम फुटला

स्टेअरिंग लॉक झाल्याने एसटी पलटी घटनास्थळी जमलेल्या लोकांना अपघात पाहून घाम फुटला

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १६ ऑगस्ट २०२३:- बुलढाणा जिल्ह्यात एसटीचा आज सकाळी सात वाजता अपघात झाला आहे. अपघाताची माहिती समजल्यानंतर घटनास्थळी पालकांसह इतर नागरिकांनी गर्दी केली आहे. स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी एसटी पलटी झाली, त्या एसटीत विद्यार्थी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पालकांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघात झालेल्या एसटीत जवळपास २५ च्या पुढे विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे. जखमी झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एसटीचा चालक सुध्दा गंभीर जखमी झाला असून एसटीचं स्टेरिंग लॉक झाल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचं चालकाने सांगितलं आहे. काही विद्यार्थी गंभीर असल्यामुळे पालक चिंतेत आहे.

एसटी एका खड्ड्यात पलटी झाल्यामुळे
अपघात झालेला रस्ता अरुंद असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर पावसामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला छोटी मोठी झुडपं आली आहेत. एसटी एका खड्ड्यात पलटी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दुखापत झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना किरकोळ जखम झाली आहे, त्यांच्यावर उपचार करुन घरी सोडून देण्यात आलं आहे. एसटी बस दुपारपर्यंत तिथून बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती समजली आहे.

चालू गाडीचं स्टेअरिंग लॉक
बुलढाणा जिल्ह्यात सवणा ते चिखली या दरम्यान एस टी बसचा अपघात झाला आहे. चालू गाडीचं स्टेअरिंग लॉक झाल्यामुळं हा अपघात झाला असल्याचं सांगितलं जातं आहे. अपघातमध्ये दहा ते पंधरा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. सहा विद्यार्थी गंभीर तर चालक सुद्धा जखमी झाला आहे. बस सवणा येथून चिखली कडे जात होती. बसमध्ये साधारण विद्यार्थ्यांसह 25 प्रवाशी प्रवास करीत होते. सकाळी सात वाजता ही घटना घडली आहे. ज्यावेळी अपघात झाल्याची माहिती समजली त्यावेळी नातेवाईकांनी तिथं गर्दी केली होती.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp