अकोला न्यूज नेटवर्क स्वप्निल सुरवाडे प्रतिनिधी पातुर दिनांक ०८ जानेवारी २०२४:-पातूर : पोलिस स्थापना सप्ताहाच्या औचित्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व विविध शस्त्रांची माहिती देण्यात आली.महाराष्ट्र पोलिस स्थापना सप्ताहाच्या निमित्ताने पातूर शहरातील स्थानिक तुळसाबई कावल महाविद्यालयाच्या एनसीसी च्या ११ महाराष्ट्र बटालियन च्या कॅडेट्सना पातूर पोलीस स्टेशन येथे पोलिसांच्या कार्याबद्दल सविस्तरपणे माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.तसेच पोलीस खात्याकडून वापरण्यात येणाऱ्या शस्त्रांची माहिती देण्यात आली. पिस्तूल हँडगनची सुधारित आवृत्ती आहे. त्यात रिव्हॉल्व्हर सारख्या गोळ्यांसाठी फिरणारे सिलेंडर नाही, तर एक मॅगजीन बसवली आहे. यामध्ये स्प्रिंगद्वारे गोळ्या फायर पॉईंटवर लावल्या जातात आणि बंदूक चालवणारी व्यक्ती एकामागून एक गोळीबार करू शकते. यामध्ये गोळीबाराचा वेग खूप वेगवान होतो आणि बुलेट्स लोड होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.SLR(सेल्फ लोडिंग रायफल)
7.62mm SLR हे एक अतिशय चांगले आणि प्रभावी पायदळ शस्त्र आहे, ते पायदळ सैनिकांना शस्त्र म्हणून दिले जाते.हे अर्ध-स्वयंचलित, गॅस-ऑपरेट केलेले आणि सेल्फ-लोडिंग शस्त्र आहे, जे कमी कालावधीत बुलेट लोड करण्यास सक्षम आहे.
पंप अॅक्शन हा मॅन्युअल बंदुकीचा एक प्रकार आहे जो बंदुकीच्या फॉरस्टॉकवर स्लाइडिंग हँडगार्ड हलवून चालवला जातो. शूटिंग करताना, काडतूस बाहेर काढण्यासाठी आणि विशेषत: स्ट्राइकरला कॉक करण्यासाठी स्लाइडिंग फोरेंड मागील बाजूस खेचला जातो आणि नंतर चेंबरमध्ये नवीन काडतूस लोड करण्यासाठी पुढे ढकलला जातो. फोरेंड हे सहसा सपोर्ट हँडने हाताळले जात असल्यामुळे, पंप-अॅक्शनबंदुक बोल्ट-अॅक्शनपेक्षा खूप वेगवान आणि लीव्हर-अॅक्शनपेक्षा काहीसे वेगवान असते, कारण रीलोड करताना ट्रिगर हँड ट्रिगरमधून काढून टाकण्याची आवश्यकता नसते. तसेच कृती एका रेषीय पद्धतीने केली जात असल्यामुळे, ते कमी टॉर्क तयार करते जे वेगाने पुनरावृत्ती-गोळीबार करते.त्याचप्रमाणे अश्रूधुराचा वापर कधी व कसा केला जातो.दंगल नियंत्रण पोलीस कशे करतात अशी सखोल माहिती पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांनी एनसीसी च्या कॅडेट्सना दिली.यावेळी पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके,पो.उ.नि. गजानन पोटे,श्रीकांत पातोंड मेजर,राऊत मेजर,भवाने मेजर,गेडाम मेजर,तुळसाबाई कावल विद्यालयाचे एस.एस.इंगळे (ANO 11 महाराष्ट्र बटालियन NCC अकोला), एम.एस.चव्हाण सर तथा पातूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.(ANN NEWS NETWORK)