पावसाळ्यात जेवढी काळजी आपल्या सर्वांना घ्यावी लागते, तेवढीच काळजी आपण इलेक्ट्रॉनिक उपकरणांचीही घेतली पाहिजे. एसी असो, टीव्ही असो किंवा फ्रीज, त्यांची योग्य काळजी घेतली नाही तर त्यांची लाइफ कमी होऊ शकते. स्वयंपाकघरातील एका आवश्यक गोष्टीबद्दल बोलायचं झालं तर फ्रिजची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात रेफ्रिजरेटरचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे जास्त ओलावा आणि त्यातून येणारे बॅक्टेरिया. फ्रीजमध्ये जास्त ओलावा असल्याने त्यातून दुर्गंधी येऊ लागते. याशिवाय पावसाळ्यात काही गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर तुमच्या अन्नावरही बुरशीची समस्या उद्भवू शकते.

पावसाळ्यात या त्रासांपासून दूर राहण्यासाठी, तुमच्या रेफ्रिजरेटरच्या दरवाजाच्या सीलमध्ये कोणतेही गॅप किंवा क्रॅक तर नाही ना हे सुनिश्चित करा. पावसाळ्यात फ्रीजचा दरवाजा जास्त वेळ उघडा ठेवू नका आणि शक्य असेल तेव्हा 4-6 दिवसात फ्रीज चेक करत राहा. यावरुन तुम्हाला बुरशी येतेय की नाही हे कळेल. दर काही दिवसांनी फ्रीज साफ करणे खूप महत्वाचे आहे., परंतु पावसाळ्यात, आपण नियमितपणे आपला फ्रीज स्वच्छ करण्याची सवय लावली पाहिजे. फ्रीजचे सर्व शेल्फ बाहेर काढा आणि कोमट पाणी आणि थोडे साबणाचे पाणी लावून आतील बाजू पूर्णपणे स्वच्छ करा.

दर काही दिवसांनी फ्रीज साफ करणे खूप महत्वाचे आहे., परंतु पावसाळ्यात, आपण नियमितपणे आपला फ्रीज स्वच्छ करण्याची सवय लावली पाहिजे. फ्रीजचे सर्व शेल्फ बाहेर काढा आणि कोमट पाणी आणि थोडे साबणाचे पाणी लावून आतील बाजू पूर्णपणे स्वच्छ करा. नंतर सुती कापड त्या मिश्रणात भिजवून रबर स्वच्छ करा. यानंतर कोरड्या कापडाने पुसून टाका. यामुळे फंगस तर दूर होईलच, पण फ्रीजही चमकू लागेल.


Share post:

Popular

More like this
Related

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३...

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या...

घरात अचानक गजानन महाराज प्रगटले? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ :...

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये...
error: Content is protected !!