अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २० जुलै २०२३ गणेश बुटे प्रतिनिधी चोहट्टाबाजार – विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना सातत्य, जिद्द व चिकाटी ठेवून अभ्यास करावा व आपण कोणतेही काम करताना अपयश आले तर खुचून न जाता पुन्हा प्रयत्न करत पुढे, असे मत दहीहंडा पोलिस स्टेशन चे नव्याने रुजू ठाणेदार वानखडे यांनी व्यक्त केले.
चोहोट्ट बाजार येथील सार्वजनिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शाळेमध्ये गुरुवारी दिनांक २० जुलै रोजी दहीहंडा पोलीस स्टेशनला नुकत्याच रुजू झालेले ठाणेदार सेवानंद वानखडे यांचा शिक्षकवृंद कडून सत्कार करण्यात आला. यावेळी महर्षी वाल्मिकी ऋषी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रम मध्ये ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी विद्यार्थ्यांनी इंटरनेट, सोशल मिडियाचा वापर व सुरक्षीतता या संदर्भात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले,
यावेळी सार्वजनिक विद्यालय व महाविद्यालयचे वतीने ठाणेदार यांचा शाल पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक प्रविण साळकर मोहनभाऊ बुंदे पाटील (संचालक), मेंढे सर, घुगे सर, शरद बुंदे सर, बुटे सर, मोहोड सर, खोटरे सर, राणे सर, डोबाळे सर.दहीहंडा पोलिस स्टेशन चे पोलिस कर्मचारी राहुल खांडवाये, वाकोडे, तसेच विद्यार्थी वर्गकार्यक्रमाला उपस्थित होते.