अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १० ऑक्टोबर २०२३ :-अकोल्या जिल्ह्य़ातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून लोहारा येथील नवनीत मोरे वय वर्ष अंदाजे ४० या शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवार सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बाळापूर तालुक्यातील लोहारा येथील शेतकरी नवनीत मोरे हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. मात्र, सततच्या नापिकीमुळे फारसे उत्पादन निघत नव्हते. त्यामुळे ते नैराश्यात गेले होते. तर दुसरीकडे बॅंकेकडून घेतलेल्या पीक कर्जाचा डोंगरही वाढत चालला होता. शेतीतून उत्पादनच निघत नसल्याने बॅंकेकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे? याच विवंचनेत ते नेहमी असायचे.
त्यामुळे आज आपल्या घराजवळील बौद्ध विचारातील खोलीत आपली जीवन यांञा संपवली या घटनेची माहीती उरळ पोलीसांना देण्यात आल्यानंतर उरळ येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून उच्चारासाठी मृतदेह शेगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास उरळ पोलीस करित आहेत. नवनीत मोरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई नातवंडे असा परिवार आहे.