Saturday, April 13, 2024
Homeताज्या घडामोडीपोलिस चौकी चोहोट्ट बाजार इमारत बनली धोकादायक जीव धोक्यात घालून चालते कार्यालयीन...

पोलिस चौकी चोहोट्ट बाजार इमारत बनली धोकादायक जीव धोक्यात घालून चालते कार्यालयीन कामकाज जनतेच्या सुरक्षेसाठी 24 तास झटणारे पोलीस मात्र सतत मृत्यूच्या सावटाखाली

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २० फेब्रुवारी २०२४ :- सद्रक्षणाय खलनिग्रणय ब्रीद वाक्य घेऊन 24 तास सेवा देणारे पोलीस कर्मचाऱ्यांना नेहमी जोखीम पत्करावा लागत असतो.सण असो या मारहाण, दंगल आदी कुठल्याही घटनांमध्ये जनतेच्या सुरक्षेसाठी महत्वाची भूमिका निभावतात ते म्हणजे पोलीस कर्मचारी. दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीतील गावांची संख्या पाहता पोलीस कर्मचारी संख्या पाहिजे त्या प्रमाणात अपुरी पडत आहे. कुटुंबियांना सोडून केवळ आपल्या जनतेच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र ऑन ड्युटी असतात. मात्र दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या चोहोट्ट बाजार आणि कुटासा पोलीस चौकी परिस्थिती भयाण आहे. आपल्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटणाऱ्या पोलीस मात्र सतत मृत्यूच्या सावटाखाली वावरत आहे. इतकेच नव्हे तर स्वतः पोलीस ड्युटी वरून आल्यावर ते देखील या मृत्यूच्या सावटाखाली वावरतात. पोलीस चौकी कामकाज करिता असलेली इमारत मात्र मोडकळीस आली आहे.

पोलिस चौकी चोहोट्ट बाजार इमारत जीर्ण झाल्याने खिंडार पडलेले, काही ठिकाणी भिंतीला तडे आतील बाजूस फरशी उखडलेली, वर गळके छत कधी अंगावर पडणार सांगता येत नाही. तर पावसाळ्यात ओलावा येणाऱ्या भिंती… अशी विदीर्ण, मोडकळीस आलेल्या चोहोट्ट बाजार पोलिस चौकीच्या इमारतीत पोलिसांना दैनंदिन कामकाज करावे लागत आहे.

याच परिसरात जिल्हा परिषद बांधकाम विभाग कडून 2009 मध्ये 20 लाख रुपये खर्च करून विश्राम गृह बांधण्यात आले मात्र विश्राम गृह धूळखात पडले असता दुसरीकडे मात्र, दहीहंडा पोलिसांना सुमारे १०० वर्षे जुन्या धोकादायक टिन पत्राच्या इमारतीत कामकाज करावे लागत आहे. इथे पोलिसांना साध्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत. ओलावा आलेल्या भिंती कोसळण्याची शक्यता आहे. जुन्या टिन पत्राचे असलेले छपरातून पावसाळ्यात गळती होऊन खोल्यांमध्ये ओलावा येतो. त्यामुळे, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी पोलिस चौकी असुरक्षित झाली आहे. खोल्यांमधील फरशा उखडल्या असून त्या झाकण्यासाठी कार्पेट टाकण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

कोड:- पोलिस स्टेशन दहीहंडा येथे मुख्य स्टेशन येथे अद्यावत इमारत बांधण्यात आले .एकीकडे पोलीस कर्मचारी जीव धोक्यात घालून डुटी करीत आहेत मात्र बाजूलाच पोलीस स्टेशन नव्याने बांधण्यात आलेली इमारत सुसज्ज सोय सुविधा असताना सुधा अर्धवट बांधकाम तसेच उद्घाटन न झाल्याने नवीन इमारत वापरवाचून पडून आहेत.

कोड:- पोलिस स्टेशन दहीहंडा हद्दीत 2 पोलीस चौकी असताना कुटासा येथील पोलिस चौकी जणू चोरीला गेली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तिथल्या पोलिस चौकी च कारभार गावातील ग्रामपंचायत कार्यालयातील इमारत मध्ये चालत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!