अकोला न्युज नेटवर्क दिनांक २६ जुलै २०२३:- दहीहंडीचा समावेश खेळामध्ये (include Dahi Handi in the game) करण्याचा निर्णय शिंदे-फडवणीस सरकारने घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ यांनी (Chief Minister Eknath Shinde) यांनी विधानसभेत दहीहंडीचा खेळात समावेश करण्यात आल्याची घोषणा केली होती. यानंतर आता प्रो कबड्डी प्रमाणे राज्यात प्रो दहीहंडी स्पर्धा सुरू केल्या जाणार आहेत. राज्यात प्रो कबड्डी प्रमाणे प्रो दहीहंडी स्पर्धेचा थरारा रंगाणार आहे. मुख्यमंत्री शिंदे याबाबत मोठा निर्णय घेणार जाहीर करणार आहेत.
शिंदे-फडवणीस सरकारने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला होता. यानंतर प्रो कबड्डी प्रमाणे राज्यात प्रो दहीहंडी स्पर्धा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. दहीहंडी पथक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाची बैठक विधनभवनात होणार आहे. या बैठकीत प्रो दहीहंडी या बद्दलच्या नियावली वर चर्चा होणार आहे. महाराष्ट्र शासन कडून पहिल्यांदा प्रो दहीहंडी स्पर्धा घेण्याची घोषणा मुख्यमंत्री करणार आहेत.
दही हंडी दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी घेतला होता. यानंतर दहीहंडीचा समावेश खेळामध्ये (include Dahi Handi in the game) करणार असल्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला मुख्यमंत्री एकनाथ यांनी (Chief Minister Eknath Shinde) यांनी घेतला होता.