अकोला न्यूज नेटवर्क,सागर भलतिलक,प्रतिनिधी बोर्डी, दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ :-अकोट शहरात दि. ३० जुलै २०२३ रोजी कास्तकर भवन,आकोट येथे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यात समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उत्साहात सहभागी झाले होते.प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून मा.आ.नारायनरावजी गव्हाणकर यांची लाभली होती तसेच रामेश्वरभाऊ फुंडकर, अकोला अर्बन बॅक आकोला जिल्हा परीषेदेचे उपाध्यक्ष सुनिलभाउ फाटकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकरभाऊ मानकर म्हणुन लाभले,माजी जि.प.अध्यक्षा सौ.संध्याताई वाघोडे,अकोट पंचायत समिती सभापती सौ.हरीदीनीताई वाघोडे,प्रदीपभाउ वानखडे,माजी जि प सदष्य मनोहरराव शेळके,माजी जि.प.सदस्य डाॅ.पुरुषोत्तम दातकर,माजी सभापती कांतीराम गहले,आकोट काॅटन मार्केटचे उपसभापती अतुल भाउ खोटरे,उपसभापती प.स.संतोषभाउ शिवरकार,डाॅ.गजानन महल्ले,माजी जि. प.सदस्य डाॅ.ज्ञानेस्वर मानकर,माजी जि.प.सदस्य मंदाताई कोल्हे,माजी जि.प.सदस्य शोभाताई शेळके,माजी सभापती जिल्हा परीषेद अकोला ज्ञानेस्वर दहिभात,पं.स.सदस्य सौ.वर्षाताई राऊत, माजी उपसभापती प स आकोट, मंगलाताई पांडे जिनिंग प्रेसिग सदस्य,राधाताई काळे पं.स.सदस्य, प्रकाशजी आतकड जि.प.सदस्य,शुकदास महाराज गाडेकर,विजयजी कुटे,डॉ.संतोषजी धोटे,डाॅ.विजयजी म्हैसने,डाॅ.सचीनजी म्हैसने,गोपालभाउ सपकाळ सदस्य काॅटन मार्केट,रामदासजी थारकर उपाध्यक्ष जिनीग प्रेसिंग,संजयजी मानकर,अनोख राहणे,विजयजी ढोरे,विजय ढेपे,शाम गावंडे राजेश भालतीलक,अनोख रहाणे इ.सह मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांनी जगतगुरु संत तुकाराम महाराज व छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन व हारार्पन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.तद्नंतर आयोजकांच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांचा स्वागत संभारभ कार्यक्रम संपन्न झाला विविध क्षेञात गौरव प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयोजकांनी सत्कार करून सन्मानित केले.त्यामध्ये प्रामुख्याने एम.पी.ए.सी.राज्यसेवा परीक्षेत विविध विभागात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मानित केले.विविध स्पर्धा परीक्षेत नेञदिपक यश मिळवलेले विद्यार्थी यांना भविष्यात प्रेरणा व आत्मविश्वास मिळण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन आकोट तालुक्या जगदगुरु प्रतिष्ठान अकोट च्या वतीने करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.गजानन महल्ले यांनी केले तर प्रमुख अतीथी म्हणुन लाभलेले श्री.माजी आमदार नारायनरावजी गव्हाणकर यांनी कुणबी समाजाच्या युवकांनी व समाज बांधवांनी यापुढील वाटचाल कशी करावी याबाबत सखोल असे मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले.समाजाची दिशा दशा बदलवीने व युवकांनी समाजहिताला प्राधान्य द्यावे,उच्च शिक्षणामुळे माणसाची प्रगती होते,माणसाच्या प्रगती मुळे समाजाची प्रगती होते परंतु आपण या माध्यमातून प्रगती करून उच्च पदावर गेल्यावर आपल्या समाजाला विसरु नये.समाज बांधवांच्या सुख दुःखात वेळोवेळी मदतीला धावुन यावे. समाज बांधीलकी जोपासावी अश्या आशयाचे मार्गदर्शन प्रमुख मान्यवरांनी केले.सदर सत्कार सोहळा व समाज मेळाव्याला जिल्हातील कुणबी समाजातील नामवंत नेते तसेच प्रतिष्ठित ख्याती प्राप्त मान्यवर यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.विशेष बाब सदर उपक्रमात महीला वर्गाचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता हे फार मोलाची गोष्ट होती.यापुढे समाज बांधवांनी विविध सामाजिक कार्यक्रम जगदगुरु प्रतिष्ठान अकोटच्या वतीने माध्यमातून राबविण्यात यावेत असा आशावाद अनेकांनी यावेळी व्यक्त केला.
.मुख्य सत्कार सोहळ्यात जवळपास १२० प्रावीन्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी मानचिन्ह देऊन करण्यात आला.त्यामध्ये नुकतेच नोकरीवर लागलेले युवक व युवती समाजातील पुरस्कार प्राप्त डॉ.सचीन रमेशराव म्हैसने व कक्ष अधिकारी मुंबई मंत्रालयात पदोन्नती झालेले अविनाश अतकड व अकोला जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर यांचा सत्कार प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आला.समाजातील ज्या युवक युवती यांनी फार चांगल्या पदावर आपली निवड सार्थ ठरविली त्याचा सत्कार आज समाज बांधवांच्या सह परिवार उपस्थितीत करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहोकार सर यांनी केले तर आभार अमोल काळने यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय ढेपे,शाम जवंजाळ,अनिकेत पोतले,शुभम गावंडे,श्रिकांत चांदणे,राहुल पोटे,धीरज गावंडे,बंटी पांडे,पुप्पक चेडे,अनोख रहाणे विनोद राउत श्रीकांत मानकर ,तेजस भालतीलक,विशाल भालतीलक,सचीन वतडकार,देवेद्र गावंडे,सुनील खीरकर,अमेय महल्ले,शाम वानखडे यांच्या सह जगदगूरु प्रतिष्ठान चे आजी माजी सर्व पदाधिकारी समाज बांधव युवक महिला वर्ग तसेच सागरजी तळोकार यांच्यासह समाजातील शिक्षक बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले.तसेच या कार्यक्रमाला गौरवचिन्ह हे धीरज गावंडे तर प्रमाणपञ हे नरेंद्र काकड
तसेच बॅनर प्रविणभाउ महल्ले यांनी दिले.तसेच डॉ.संतोष थोटे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना जगतगुरु तुकाराम महाराज यांचे फोटो भेट दिले.डाॅ.तेजेस टीकार,अमोल काळणे,अतुल भालतीलक या कार्यक्रमाला अकोला,अकोट,हिवरखेड,तेल्हारा परिसरातील समाज बाधंव यांची मोठ्या संख्येने उपस्थीती लाभली.