अकोला। 16 जून 2023 रोजी शनिवारी रात्री वाशिम बायपास जवळील जीआर रुग्णालयासमोर एका अपंग व्यक्तीचा अज्ञात आरोपींनी डोक्यात लोखंडी वस्तूने वार करून खून केला. घटनास्थळापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या टँकरच्या मागे मृतदेह टाकून आरोपींनी पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून तया२४ दिवस उलटूनही पोलिसांना आरोपींबाबत कोणताही सुगावा लागू शकलेला नव्हता मात्र पोलिसांना तपास सुरु असतानाच अरोपी गवसला होता मात्र खात्री पटली नव्हती म्हणून त्यांचेवर लक्ष ठेवले जात असताना खात्री पटली आणि त्याच्या मागावर जात आरोपीला स्थानीक गुन्हे शाखा पोलीसांनी दिल्ली येथून अकोल्यात आणले आहे हे मोठे यश पोलिसांना मिळाले आहे पोलीसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता १७ जुलै पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश आज न्यायालयाने दिले आहेत

हत्येनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिक गुन्हे शाखा आणि जुने शहर डीबीच्या कर्मचाऱ्यांनी मृताचा मोबाईल शोधून संशयितांची नावे शोधण्यास सुरुवात केली. गुन्हा घडू शकतो अशा सर्व शक्यता पोलीस तपासत असतांना पोलिसांना आ रो पी गवसला होता मात्र शंभर टक्के खात्री पटल्यानंतर पोलीसांनी आरोपीच्या मागावर दिल्ली पर्यंत जाऊन अखेर आज अगोपीच्या मुसक्या दिल्लीत आवळल्या आणि फरफटत अकोल्यात आणून न्यायालयात हजर करुन न्यायालयाच्या आदेशानंतर १७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी मिळवली त्यामूळे प्रा रणजित इंगळे हत्याकांड चे कारण उघड होणार आहे

अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही पोलिसांना आरोपींना अटक करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे आरोपींनी परफेक्ट खून केला आहे का, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू असतांनाच. प्राध्यापकाची हत्या करणाऱ्या आरोपींचा शोध पोलिसांसमोर मोठे आव्हान होते हत्येची माहिती मिळताच शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष दुधगावकर, स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, एपीआय गोपाळ ढोले, पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार हे त्यांच्या पथकासह दाखल झाले होते . मृतकाची दुचाकी व खिशाची झडती घेतली असता खिशात 41 हजार 500 रुपये रोख आढळून आले मात्र मृताचा मोबाईल गायब होता. त्यावरून ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली नसल्याचे स्पष्ट झाले होते. या हत्येमागे काही वैयक्तिक वैमनस्य आहे. खुनासारखी घटना घडली , या खुनाला तब्बल 24 दिवस उलटून गेल्यानंतरही आरोपी पोलिसांपासून दूर होता असे वाटत असताना पोलिसांना आरोपी आधीच स्पष्ट झाला होता मात्र पूर्णपणे खात्री झाल्याशिवाय अटक करणे चुकीचे ठरू शकते म्हणून पोलीसांनी उशीराने मात्र अखेर बेड्या ठोकल्या. यामुळे जूने शहर पोलीस आणि स्थानीक गुन्हे शाखा पोलिसांचे कौतुक होत आहे

एलसीबीची महत्त्वाची भूमिका

यवतमाळमधील एलसीबी आणि वणी पोलीस ठाण्याची कमान चोखपणे सांभाळणारे पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कार यांच्याकडे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी एलसीबीची कमान सोपवली आहे. त्यांनी एलसीबी या खून प्रकरणाच्या गूढावरून पडदा हटवून आरोपींना तुरुंगात टाकन्यसाठी आरोपीचा माग काढत दिल्ली गाठली आणि आरोपीला जेरबंद करुन अकोल्यात आणले आणि अधिक तपासासाठी जूने शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे आरोपीला जेरबंद करण्यासाठी यांना मोठे यश मिळाले आहे


Share post:

Popular

More like this
Related

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३...

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या...

घरात अचानक गजानन महाराज प्रगटले? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ :...

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये...
error: Content is protected !!