अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १९ जुलै :- शेतकरी संकटात, दुबार पेरणीचे संकट, कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार,
अकोला न्युज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वडेगाव दिनांक 19 जुलै 2023 :- पातूर तालुक्यातील तुंलगा बु येथील शेतकरी यांनी महाबीज मंडळ चे बियाणे वाडेगाव येथील कृषी केंद्रातून घेतले असता ते बियाणे उगवले नसल्याने युवा शेतकरी मोहन कचाले यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे १६ जुलै रोजी तक्रार देण्यात आली आहे.. तक्रारीत असलेल्या माहितीनुसार तुंलगा बु येथील अनेक शेतकऱ्यांनी महाबीज चे बियाणे घेऊन त्या बियांची पेरणी केली परंतु अनेक शेतकऱ्यांचे शेतातील बियाणे उगवलेच नाही.त्यामुळे मोहन कचाले यांनी संबधित दुकानदार यांच्याकडे विचारणा केली असता आम्हाला काहीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले आहे.तसेच मोहन कचाले यांच्या शेत सर्व्हे नंबर ५५ मध्ये पेरणी क्षेत्र १ हेक्टर २० तर उमेश उंबरकर यांच्या १९० सर्व्हे मधील ९० आर,विनोद गिरी यांनी ९ दिवस अगोदर बियाणे विकत घेऊन पेरणी केली.
त्यावर पाऊस पडला आज रोजी शेतात पाहणी करून सुद्धा बियाणे उगवले नसल्याचे आढळून आले आहे.तसेच काही शेतकऱ्यांना दुकानदार यांनी दुसरे बियाणे उपलब्ध करून दिले त्यांनी दुबार पेरणी केली आहे.परंतु मोहन कचाले यांनी तक्रार दिली असल्याने मला बियाणे दिले नसून संबधित विभागाला कळवा असे सांगण्यात आले आहे.तरी संबधित विभागाचे अकोला मंडळ कृषी अधिकारी एस एम अटक,कृषी सहायक अनिल सुरवाडे आदी अधिकारी यांनी पाहणी केली असता बियाणे उगवले नसल्याचे सांगण्यात आले आहे.तरी मला संबधित विभागाने तत्काक दाखल घेऊन आम्हा सर्व शेतकऱ्यांना बियाणे व पेरणी खर्च दुबार पेरणी खर्च देण्यात यावा व फसवणूक केलेल्या दुकानावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी मोहन कचाले यांनी तक्रारीत नमूद केले आहे…
महाबीज मंडळाचे बियाणे वाडेगाव येथील कृषी केंद्रातून घेऊन ते पेरणी केली परंतु आठवडा होऊन सुद्धा उगवले नाही.याबाबत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.संबधित विभागाने तत्काळ दखल घेत कारवाई करण्यात यावी तक्रारी नुसार शेतकरी यांच्या शेतात पाहणी केली तर बियाणे उगवले नसून,बीज सडून आल्याचे दिसून आवई आहे.याबाबत वरिष्टकडे अवहाल पाठविण्यात आला आहे..
मोहन कचाले युवा शेतकरी
मोहन कचाले युवा शेतकरी
अनिल सुरवाडे
कृषी सहाय्यक कृषी विभाग पातूर