Friday, December 6, 2024
Homeताज्या घडामोडीअकोल्यात भटक्या कुत्र्यांची दहशत दरदिवशी ५० जणांना चावा!

अकोल्यात भटक्या कुत्र्यांची दहशत दरदिवशी ५० जणांना चावा!

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०१ फेब्रुवारी २०२४:- जिल्ह्यात भटक्या श्वानांची दहशत वाढत असून महिनाभऱ्यात १ हजार ४९६ नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबतचा डिसेंबर महिन्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून सुदैवाने यापैकी कोणाचाही मृत्यू झाला नाही. उपचारानंतर सर्व रुग्ण बरे झाले असले तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

महापालिका, नगरपालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात कुत्रा चावण्याच्या अनेक घटना गत काळात समोर येत आहेत. श्वानांच्या चाव्याचे दररोज नागरिक बळी ठरत आहेत. विशेष म्हणजे शहरात ठिकठिकाणी भटक्या श्वानांचे मोठे कळप सर्रासपणे दिसू लागले आहेत. कुत्र्यांच्या संख्येवर संबंधित मनपा, नगरपालिका, ग्रामपंचायत प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाकडून उपाययोजना आलेली नाही. कायमस्वरूपी राबविण्यात चावा घेतलेल्या या सर्व रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात करण्यात आले आहेत. यामध्ये १ हजार ११७६ पुरुष तर ३८० महिलांचा समावेश आहे. (akola ann news network)

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp