Thursday, May 23, 2024
Homeक्राईमआधी मारला कॅमेऱ्यावर स्प्रे मग केले सोन्या चांदीचे दुकान सफ दागिने घेऊन...

आधी मारला कॅमेऱ्यावर स्प्रे मग केले सोन्या चांदीचे दुकान सफ दागिने घेऊन चोरटे पसार…

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २० जुलै २०२३ राहुल सोनोने प्रतिनिधी वडेगावं – अकोला जिल्ह्यात चोरट्यानि ज्वेलर्स चे दुकाने टार्गेट करण्यास सुरुवात केली असून शहरातील सराफचे दुकान फोडून 24 तास होत नाही तोच वडेगाव येथील देखील दोन दुकाने चोरट्यांनी फोडून लखोंचा माल पार केला अकोला शहरातील ज्वेलर्स च्या दुकानात चोरी केल्या नंतर सीसी टीव्हीचा डीव्हीआर या चोरट्यांनी पळवला तर वडेगाव येथील दोन्ही ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करतांना थेथील सीसी टीव्ही स्प्रे मारून काळे करण्यात आल्याने जणू या चोरट्यांनी अकोला पोलिसांना आव्हानच दिले आहे.

अकोला शहरा सह जिल्ह्या आता चोरट्यांनी लक्ष केला असून आता हे सराईत आणी हुशार चोरटे पकडले न जावे म्हणून विविध शक्कल लढवत सोन्या चांदीच्या दुकानांना आपले टार्गेट करीत असल्याचे दोन दिवसात दिसून आले. अकोला शहरातील खादान पोलीस स्टेशन आतर्गत येणाऱ्या सहकार नगर येथील मुख्य रस्त्यावर असलेले शिवरत्न ज्वेलर्स मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडले असल्याची होती घडली होती त्यात चोरट्यांनी दुकानातील कधी कोंडा व आत लावण्यात आलेले ग्रील तोडून आत प्रवेश करून चांदीच्या साहित्या सह एक दुचाकी देखील चोरली तसेच आपला सुगवा लागू नये म्हणून या ज्वेलर्सच्या दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर देखील चोरून नेला. या घटनेला 24 तास देखील उलटले नाही तोच वडेगाव येथे देखील दोन सोन्या चांदीचे दुकाने या चोरट्यांनी फोडले.

बाळापूर तालुक्यातील वाडेगाव पोलीस चौकी अंतर्गत ग्रामपंचायत जवळ असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्स व दुसरे निलेश करहे यांचे सुद्धा लक्ष्मी ज्वेलर्स या नावाने असलेल्या दुकानात १९ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास माध्यरात्रीला कोणी अज्ञात व्यक्तीकडून दुकानचे शटर चे कुलूप तोडून मुद्देमाल चोरी गेल्याचे उघडकीस आले आहे. विजय विनायक प्रांजळे यांनी दिलेल्या पोलीस तक्रारीनुसार त्यांचे दुकान रोज नियमानुसार रात्री ९ वाजता कुलूप लावून बंद करून घरी निघून गेले.

त्यानंतर २० जुलै रोजी पहाटे रंजित अहिर यांना पहाटेचे सुमारास दुकान उघडे असल्याचे दुकानदार यांना सांगितले. त्यांच्या सांगण्या नुसार तत्काळ दुकानात येऊन पाहिले असता लॉकर व ड्राव्हर आदी उघडे दिसून आले. दुकान मालकाने तक्राती फक्त २० हजाराचे दागिने चोरी गेल्याचे म्हटले असले तरी लाखोचे दागिने चोरी गेल्याची चर्चा वाडेगावात सुरु आहे. तसेच निलेश करे यांचे मालकीचे लक्ष्मी ज्वेलर्स च्या दुकानात चोरी झाली असून या ठिकाणी पाहणी केली असता कोणतेही मौल्यवान वस्तू चोरी गेली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. याबाबत वाडेगाव पोलिस यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला. पुढील तपास वाडेगाव पोलिस करीत आहेत..

चोरट्यांची अनोखी शक्कल आणी अकोला पोलिसांना आव्हान

शहरात व वडेगाव येथील ज्वेलर्स मध्ये झालेल्या दोन्ही चोऱ्यांमध्ये चोरट्यांनी पकडले न जावे म्हणून वेगवेगळी शक्कल लढावली आहे अकोला शहरात झालेल्या चोरीत चोरट्यांनी सीसी टीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला तर् वडेगाव येथील चोरीत चोरट्याने चक्कत कलर स्प्रे चा उपयोग करून सीसी टीव्ही चे कॅमेरे काळे केले या दोन्ही चोऱ्यान मध्ये चोरटे सीसी टीव्हीत कैद तर झाले पण पकडल्या न जावे म्हणून अनोखी शक्कल लढवत अकोला पोलिसांना चॅलेज देखील केले आहे आता अकोला पोलीस या चोरट्यांचा कसा व किती लवकर माग घेतात याकडे अकोलेकरांचे लक्ष लागली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!