Wednesday, December 6, 2023
Homeताज्या घडामोडीअकोलामध्ये नुस्ता धुव्वा फटाक्यांच्या आवाजानं रस्त्यावरचे पक्षी - कुत्रे गायब

अकोलामध्ये नुस्ता धुव्वा फटाक्यांच्या आवाजानं रस्त्यावरचे पक्षी – कुत्रे गायब

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १४ नोव्हेंबर २०२३ :- अकोल्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. त्यातच आता फटाक्यांच्या धुराने गेल्या दोन दिवसांपासून भटके कुत्रे आणि पक्षी देखील गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत अकोल्यात हवेची गुणवत्ता ११५ इतकी नोंदविली गेली आहे. ही हवा इतकी घातक आहे की, आपण श्वास घेतोय की सिगारेट ओढतोय? अकोल्यात खूप जास्त प्रमाणात फटाके फोडण्याची माहिती समोर आली आहे. रात्री अकोल्यात सर्वत्र धुराचे लोट पाहायला मिळाले. हवेतील प्रदूषण हे AQI म्हणजे एअर क्वॉलिटी इंडेक्सने मोजले जाते. नियमाप्रमाणे ७ ते १० वाजेपर्यंत फटाके फोडण्याची वेळ आहे. मात्र अकोल्यात रात्री १ वाजेपर्यंत फटाके फोडत असल्याचे निदर्शनास आले. आणि आता फटाक्यांच्या धुरामुळे झालेल्या प्रदूषणामुळे अकोल्यात हवा आता विषारी बनली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!