Thursday, May 8, 2025
Homeब्रेकिंगयंदा स्‍वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्‍सवानिमित्त लाल किल्‍ल्‍याभोवती अभेद्य सुरक्षाकवच

यंदा स्‍वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्‍सवानिमित्त लाल किल्‍ल्‍याभोवती अभेद्य सुरक्षाकवच

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक०८ ऑगस्ट २०२३ :-यंदा स्‍वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्‍सवानिमित्त लाल किल्‍ल्‍याभोवती सुरक्षादलाचे सैनिक तैनात करण्‍यात आले आहे. १५ ऑगस्‍टला स्‍वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्‍सवासोबतच ‘जी-२०’ची झलकही पहायला मिळणार आहे. १५ ऑगस्‍टला होणारी पतंगबाजी लक्षात घेऊन सुरक्षाव्‍यवस्‍था बळकट करण्‍याच्‍या दृष्‍टीने लाल किल्‍ल्‍याच्‍या सभोवती सुलतान (पतंग पकडणारे) आणि पोलीस कमांडो तैनात करण्‍यात येणार आहेत. याशिवाय लाल किल्‍ल्‍याच्‍या सुरक्षेसाठी अनेक आधुनिक सुरक्षा उपकरणांचा वापर केला जाणार आहे.

१. चेहरा ओळखण्‍याच्‍या आधुनिक प्रणालीसह सीसीटीव्‍ही कॅमेर्‍यांमध्‍ये आतंकवाद्यांची माहिती जतन केली जाईल. ही माहिती लाल किल्‍ल्‍यावर उभारण्‍यात येणार्‍या सुरक्षा नियंत्रण कक्ष पाहू शकणार आहे. चेहरा ओळखण्‍याच्‍या प्रणालीला संशयास्‍पद चेहरा आढळताच सुरक्षा नियंत्रण कक्षाला तात्‍काळ सतर्क संदेश प्राप्‍त होईल.

२. लाल किल्‍ल्‍याच्‍या सुरक्षेत प्रतिवर्षीप्रमाणे चांदणी चौक रस्‍त्‍यावरही उंच कंटेनर उभे केले जात आहेत. लाल किल्‍ल्‍याची सुरक्षा जमिनीपासून आकाशापर्यंत अभेद्य करण्‍याचे काम चालू आहे.(AKOLA NEWS NETWORK )

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp