Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीशेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघिणीचा हल्ला

शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघिणीचा हल्ला

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ६ सप्टेंबर २०२३:- धारणीपासून ४० किलोमीटर अंतरावरील दादरा येथे मंगळवारी दुपारी २ वाजता शेतात काम करणाऱ्या जखमी गीता आदिवासी युवतीवर वाघिणीने हल्ला चढविल्याची चर्चा होती. तथापि,वनविभागाने याबाबत वस्तुस्थिती पडताळून खात्री करणार असल्याचे स्पष्ट केले. तिच्या चेहऱ्यावर पंजा मारल्याने व्रण आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. यादरम्यान दोन बकऱ्या ठार झाल्या आहेत. यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. यासंदर्भात नागरिकांनी यापूर्वीच निवेदन दिले होते.गीता सुकलाल धांडे (१८) असे हल्ल्यात जखमी युवतीचे नाव आहे.

धारणीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी डेहनकर व गावकऱ्यांनी वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.दादरा परिसराला लागून असलेल्या जंगलात वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. मागील दोन महिन्यांपासून वाघीण परिसरातील आदिवासींना दृष्टीस पडत असल्याने शेतातच नव्हे,तर गावाबाहेर पडण्यासही ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.टीम करणार निरीक्षण तीन वर्षांपूर्वी मेळघाटात एका वाघिणीने एका इसमाला ठार केले होते. त्या घटनेची दहशत गावकऱ्यांमध्ये अजूनही आहे. या घटनेनंतर परतवाडा व अमरावती येथून टीम पाठविण्यात आले.

दोन बकया ठार
वाघिणीची खात्रीशीर माहिती पटली नसली तरी जखमी महिला काम करीत असलेल्या शिवारात दोन बकया ठार झाल्या आहेत, अशी माहिती मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी दिली.

शेतात काम करणाच्या
महिलेच्या चेहयावर ताजी जखम आहे. तिला रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. वरिष्ठांना माहिती दिली असून हल्लेखोर वाघ की अन्य कुठला पशू, याची पडताळणी केली जाईल. कॅमेरा व वनविभागाच्या चमूच्या मदतीने परिसरावर नजर ठेवली जाणार आहे.(AKOLA NEWS NETWORK )

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!