अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगांव दिनांक ०७ सप्टेंबर २०२३ :- वाडेगांव अकोला रस्त्यावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा नेहमीप्रमाणे अकोला आगाराची एक बस एम एच ४० ए क्यू ६४६८ या नंबर ची अकोला वाडेगाव खेट्री अकोला बस वाडेगांव येथे आली असता बस चे एक चाक पंक्चर झाल्याने तासभर बस मधील प्रवाशी ताटकळत असल्याने त्रस्त झाल्याची घटना मंगळवार रोजी सकाळी १२ च्या सुमारास घडली.
परंतु बसेच पंक्चर काढण्यासाठी बस मध्ये जॅक नसल्यामुळे टायर बाहेर काढावे कसे याबाबत वाहक चालक चिताग्रस्त होते. परंतु वाडेगाव शहर युवक कॉंग्रेस युवकांकडून प्रवाशी उभे पाहून त्यांनी घटनास्थळी विचारणा करून युवक काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश कळसकार यांनी त्यांनी स्वतः घरी जाऊन त्यांचा जॅक आणून दिला व यावेळी ऋतीक चव्हाण मंगेश अंबूसकर पंकज कळसकार, शकील भाई, उमेश शेवलकर, मारोती पिंपळे, गोपाल सरप ,यांनी हातभार लावला बसचे वाहक एस . एस . सोनोने,व चालक शे . रहेमान यांनी बस सेवा मार्गस्थ करण्यास सहकार्य केले.. अंध अपंग वृद्ध जेष्ठ नागरिक यांना सन्मानपूर्वक सेवा प्रदान करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळास मदत केल्याचे समाधान सर्वांनी व्यक्त केल.(AKOLA NEWS NETWORK)