Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीनीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-येथून जवळच असलेल्या ग्राम सुकळी येथील दोन मजूर नामे प्रफुल अंभोरे वय ४२ तथा सत्यम अंभोरे वय ३५ हे शेतात काम करीत असतांना नील गायीचा एक कळप सुसाट धावत येत असताना या दोन मजूराला जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवार सकाळी १० वाजता दरम्यान घडली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार या निलगायींच्या धडकेत प्रफुल अंभोरे हे गंभीर जखमी झाले तर सत्यम अंभोरे हे किरकोळ जखमी झाले. ही घटना योगेश धोत्रे व ओम गावंडे यांनी तत्परता दाखवीत दुचाकीने तत्काळ नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र वाडेगाव येथे दाखल करण्यात आले .या ठिकाणी प्राथमिक उपचार करून डॉ सोहेल खान यांनी अकोला येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.

दिग्रस बु परिसरात जंगली प्राण्यांचा नेहमीच हैदोस सुरू असतो.मागील महिन्यात सुद्धा असेच दिग्रस बु शेतशिवरात भारत गवई या शेतकऱ्यांना निलगायीने जखमी केले होते.परंतु याची वनविभागाकडून कोणतीही दखल घेतली नव्हती.परिणामी त्यांना मानसिक व आर्थिक सामना करावा लागला.

जखमीना अकोला उपचारासाठी १०८ ची रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने एक तास जखमी मजुरांना ताटकळत राहावे लागले.शेवटी सस्ती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश गाडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तत्काळ रुग्णावाहिका पाठवून दिली. त्यानंतर जखमी असलेल्या अंभोरे बंधूंना अकोला येथे शासकीय रुग्णलयात पाठविण्यात आले.शेतात जंगली जनावरांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे मजुरांना शेतात काम करणे कठीण झाले. वनविभागाने या जनावरांचा बंदोबस्त करावा.दिग्रस बु परिसरात झालेल्या निलगायींच्या धडकेत मजूर जखमी झाले असून या वन्यप्राण्यांच्या आलेगाव वनविभागाकडून बंदोबस्त करण्यात यावा जनेकरून शेतमजुरवर होणारे हल्ले थांबतील व जखमींना तत्काळ मदत देण्यात यावी..

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp