अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १७ जानेवारी २०२४:- अकोट शहरात एक युवक देशी कट्टे बाळगत असल्याच्या गुप्त माहिती वरून पोलिसांनी युवकावर पाळत ठेवली. दरम्यान त्याने विहिरीत टाकलेले देशी कट्टे मिळून आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
एकलव्य बचाव पथकाच्या मदतीने आज सायंकाळी २ देशी कट्टे, १ मॅगझीन, ९ जिवंत काडतुसे विहिरीतून बाहेर काढण्यास पोलिसांना यश मिळाले आहे.या प्रकरणात आणखी एका साथीदाराला ताब्यात घेण्यात आले असल्याचे समजते.
अकोट तालुक्यातील अडगाव येथील प्रफुल चव्हाण व अकोट येथे राहत असलेला अजय देठे नामक युवक अग्निशस्त्र (देशी कट्टा) जवळ बाळगून असल्याची माहिती स्थानिक डी.बी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे १५ जानेवारी रोजी युवकावर पाळत ठेवण्यात आली. आपल्यावर पाळत ठेवल्या जात असल्याची भनक या युवकांना लागताच त्याने स्वतः जवळ बाळगत शहरातील असलेले अग्निशस्त्र (akola ann news network)