Wednesday, May 8, 2024
Homeताज्या घडामोडीउमरेड खदानमध्ये नागरिकांना अचानक झाले वाघाचे दर्शन !

उमरेड खदानमध्ये नागरिकांना अचानक झाले वाघाचे दर्शन !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक०७ ऑगस्ट २०२३ :-शहराजवळील उमरेड खदानमध्ये नागरिकांना अचानक वाघाचे दर्शन झाल्याचे पाहायला मिळाले. गाडीतून जाणाऱ्या काही जणांना हा वाघ दिसल्याने त्यांना त्याला कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह आवरला नाही. डोळ्याचं(ANN NEWS)पारणं फेडणाऱ्या या दृष्यामुळे एकीकडे त्या नागरिकांना भीतीही वाटत होती. तर दुसरीकडे त्यांच्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

उमरेड करांडला अभयारण्याच्या लगतच काही
नागरिकांना परिसरात वाघ भटकंती करताना दिसून आला. उमरेड करांडला अभयारण्यात वाघ सहजासहजी दिसत नाहीत. मात्र, अचानकी या परिसरात वाघ दिसल्याने पर्यटकांची पावले पुन्हा उमरेड करांडला अभयारण्याकडे वळू लागली आहेत.दरम्यान राज्यात वाघांची संख्या सतत वाढत असून जिल्ह्यातही वाघांचा आकडा फुगला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात वाघांचे दर्शन हमखास होत आहे. यापार्श्वभूमीवर उमरेड खदानमध्ये नागरिकांना अचानकी वाघ दिसल्याने या घटनेची माहिती नागरिकांनी विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली.(AKOLA NEWS NETWORK )

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!