Saturday, November 9, 2024
Homeब्रेकिंगचिखलदऱ्यात वीज पडून काका-पुतण्या ठार; जोराचा पाऊस आल्याने शेतातील कडुनिंबाच्या झाडाखाली होते...

चिखलदऱ्यात वीज पडून काका-पुतण्या ठार; जोराचा पाऊस आल्याने शेतातील कडुनिंबाच्या झाडाखाली होते उभे

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २० जुलै :- चिखलदरा तालुक्यातील मोरगड शिवारात वीज पडून दोन मजुरांचा मृत्यू झाला. सुनील मोती भास्कर (३२) व निलेश बजरंग भास्कर (२०) असे मृत काका-पुतण्यांची नावे आहेत. कडूनिंबाच्या झाडाखाली आश्रय घेण्यास गेले असताना त्यांच्या अंगावर वीज पडली. त्यापैकी एकाचा घटनास्थळी तर दुसऱ्याचा रुग्णालयात मृत्यू ओढवला.

बजरंग मोती भास्कर या शेतकऱ्याच्या शेतात ते शेतमजूर म्हणून कामाला गेले होते. शेतीचे काम सुरु असतानाच दुपारच्या सुमारास जोराचा पाऊस सुरु झाला. विजांचा प्रचंड कडकडाट आणि जोराचा पाऊस यामुळे त्यांच्यासह इतर मजूर शेतातील कडूनिंबाच्या झाडाखाली आश्रयाला गेले. मात्र वीज त्याच झाडावर पडल्याने सर्वजणांना फटका बसला. त्यापैकी सुनील मोती भास्कर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पुतण्या निलेश बजरंग भास्कर यांची प्राणज्योत रुग्णालयात पोहोचल्यानंतर मालवली.

दरम्यान ललीता राजाराम जाम्बेंकर (४५), आरती सोमेश जाम्बेंकर (२०), पार्वती राजाराम भास्कर (४५), जानकी किशोर कास्देकर (२४), सविता गुरुशंकर धान्डेंकर (२८), होमपती लक्ष्मण मेटकर (५५), बजरंग मोती भास्कर (५५) मीना बजरंग भास्कर (४५) हे जखमी झाले. यातील ललिता बजरंग भास्कर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती होताच महसुल व पोलिस प्रशासन घटनास्थळी रवाना झाले होते. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांना मुंबई येथे या घटनेची माहिती होताच त्यांनी तत्काळ तहसीलदार व आरोग्य अधिकाऱ्यांकडून माहिती घेत योग्य ते उपचार व सहायता करण्याचे निर्देश दिले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp