अकोला न्यूज नेटवर्क स्वप्निल सुरवाडे प्रतिनिधी पातुर दिनांक 12 ऑक्टोंबर २०२३ :-पातूर तालुक्यातील गोर गरीब ग्रामीण भागातील जनतेसाठी तळागाळातील शहरापर्यंत आपल्या समस्या घेऊन येऊ शकत नाहीत, अश्या लोकांसाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सुचने नुसार तालुका अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश धर्माळ यांच्या संकल्पनेतुन जनता दरबाराचे यशस्वी आयोजन करण्यात आले व जनतेच्या विविध समस्या निकाली काढण्यात आल्या.
यामध्ये प्रामुख्याने घरकुल चे प्रश्न,अपंग बांधवांचे विविध प्रश्न, विधवा महिला,शबरी आवास, त्वरीत निकाली काढण्यात आले आणि दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात आली व प्रश्न निकाली काढण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता ताई अढाऊ,कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे,तालुकाध्यक्ष डॉ.ओमप्रकाश धर्माळ,जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर, सभापती आम्रपाली खंडारे,मायाताई नाईक,योगिताताई रोकडे, तालुका महासचिव शरद सुरवाडे,संघटक राजू बोरकर,सभापती सुनीताताई,अर्जुन टप्पे,उपसभापती इम्रानभाई रेखाताई इंगोले, निमाताई राठोड, धर्माभाऊ सुरवाडे, अर्जुन टप्पे, काशिनाथ सरदार, राहुल सरदार, विलास घुगे, नूररखान, संजय लोखंडे, राजेश महल्ले,चंद्रकांत तायडे, युवक आघाडी अध्यक्ष सुनील बंड, प्रज्वल तायडे,हर्षल खंडारे,विजय बोचरे, विजय गवई, विजय अवचार,विनय दाभाडे,सुभाष चिपळे,सावित्रीताई राठोड,हिरासिंग राठोड,विनोद देशमुख, संजय नाईक, अविनाश खंडारे, मुक्तार सर,पत्रकार निखिल इंगळे,राजू तायडे, मुरली शिरसागर, किशोर घोगरे, राष्ट्रपाल गवई,चंद्रमणी वानखडे,शैलेश गुडदे,हरिदास माने, जैदभाई,अक्षय पर्वत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडी पातूर तालुक्यातील अंतर्गत वाद यावेळी चव्हाट्यावर आला असून पक्षातील तालुक्यातील माजी पदाधिकारी व जेष्ठ नेते यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.त्याचप्रमाणे तालुका पदाधिकाऱ्यांनी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा व पदाधिकारी यांना सदर कार्यक्रमाची कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही व आमंत्रण सुद्धा दिले नसल्याने पातूर तालुका महिला आघाडीच्या पदाधिकारींनी नाराजी व्यक्त करीत कार्यक्रमाला पाठ फिरवली असून तालुका दौरा काढला होता.