अकोला न्यूज नेटवर्क दिनांक डेक्स दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ :- सप्टेंबर महिन्यात सगळीकडं गणपतीची (ganpati festival 2023) लगबग पाहायला मिळते. महाराष्ट्रात गणेशोत्सव (ganeshotsav 2023) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या अनुशंगाने प्रशासनाकडून जोरदार तयारी सुध्दा केली जाते.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. सर्वांना गणरायाच्या आगमानाचे वेध लागले आहे. बाजारात सुंदर गणेश मुर्ती आल्या आहेत, सजावटीचे सामनाने दुकाने सजली आहे. ढोल-पथकांची जोरदार तालीम सुरू आहे. सोशल मिडियावर गणरायाच्या स्वागतामध्ये असलेल्या अनेक भक्तांचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. चिमुकल्या भक्तांनाही लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता असते. दरम्यान सध्या एको चिमुकल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावर एका चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्ही थक्क होऊ जाल. चिमुकल्यांनी इतक्या सुंदरपणे हा अभिनय केला आहे की तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. विशेषत: गाण्यातील ”टुकुमुकु बघतोय चांगला” या ओळीवर त्याने जो अभिनय केला आहे तो फार गोंडस आहे. लोकांना व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला आहे. गणरायाच्या आगमानाच्या उत्सुकता त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही पाहू शकता..