Saturday, September 14, 2024
Homeब्रेकिंगखबरदार…. शहरात दाखल झाल्यास 'भिडेला भिडणार संभाजी भिडेंच्या शहर आगमनाला निवेदन देऊन...

खबरदार…. शहरात दाखल झाल्यास ‘भिडेला भिडणार संभाजी भिडेंच्या शहर आगमनाला निवेदन देऊन निषेध

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २८ जुलै २०२३:-संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या विधानामुळे चर्चेत असलेल्या संभाजी भिडे यांचे पातूर शहरात आगमन होणार असल्याची माहिती मिळाली असता शहरातील बहुजन विचारसरणीच्या सर्वधर्मीय अनुयायांनी कडाडून विरोध दर्शविला आहे.येत्या दि. ३० जुलै रोजी पातूर शहरात मनोहर कुळकर्णी उर्फ संभाजी भिडे चा कार्यक्रम प्रायोजीत असुन तसे जाहीरात होर्डिंग पातूर शहरात लागलेले आहेत. मुळात संभाजी भिडे हा विकृत मानसिकतेचा असुन खोटा इतीहास सांगुन तरूणांचे माथे भडकविण्याचे काम करीत आहे, तसेच भिमा कोरेगांव दंगल घडविणे, संविधानास विरोध करून मनुवादी विचारधारेचे नविन संविधान लागु करू अशी मनशा बाळगणारा असुन सतत बहुजन महापुरूषांबद्दल आपत्ती जनक विधान करत असतो,

हल्लीच्या काळात महात्मा फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करून या इसमाने गरळ ओखली समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे, व देशाचा राष्ट्रध्वज असलेला तिरंगा झेंडा हा मान्य नसुन राष्ट्रगित देखील स्विकार्य नाही असे म्हणुन राष्ट्रध्वजाचा व राष्ट्रगिताचा सतत अवमान करीत असतो. ते पाहता पातूर शहरात महात्मा फुले यांना माननारे माळी समाज व बौध्द समाजातील अनुयायी मोठ्या संख्येने व सलोख्याने राहतात, त्यांचा समाज व देशद्रोहीवृत्तीच्या संभाजी भिडेवर रोष आहे. त्यामुळे संभाजी भिडे हा पातूर शहरात येत असल्याची माहीती पसरलेली असता शहरासह तालुकाभरातुन निषेधाच्या प्रतिक्रिया येत आहेत

हा इसम जर पातूर शहरात अथवा थांबला तर फुले-आंबेडकर अनुयायांच्या भावना अनावर नाकारता येत नाही तसेच संभाजी भिडे हा तरुणांचे माथे भडकावुन जातीय सलोखा बिघडविण्याचे काम करत असल्यांने येथे ही तसे होण्याची शक्यता असुन त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बाधीत होवुन जातीय दंगली होणे असे प्रकार घडु शकतात, त्यामुळे सदर इसमाचा पातूर शहरात सभा घेणे, जमाव करून संबोधन करणे, थांबणे अथवा सदिच्छा भेटीच्या नावाखाली छोटेखानी सभा घेण्याचा मानस असुन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता या सर्व नमुद बाबी न होवोत यासाठी प्रशासनाने त्यास मज्जाव करून सदरची परवानगी देण्यात येवु नये अन्यथा आम्ही फुले-शाहु-आंबेडकर विचारसरणीचे अनुयायी रस्त्यावर उतरून तिव्र निषेध व्यक्त करू व सदरचा कार्यक्रम उधळुन लावु.

त्यामुळे जर कायदा व सुव्यस्था बिघडली तर त्यास प्रशासन जबाबदार असेल, म्हणुन मनोहर कुळकर्णी उर्फ संभाजी भिडे यास पातूर शहरात थांबण्यास मज्जाव घालुन कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम घेण्यासंबंधी परवानगी नाकारावी, जेणेकरून पातूर शहरात तसेच तालुक्यात शांतता प्रस्थापीत राहुन सामाजिक सलोखा कायम राहील अशा आशयाचे निवेदन पातूर शहरातील फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीच्या सर्वधर्मीय अनुयायांनी पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांना दिले.यावेळी सदर निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे मा. तालुकाध्यक्ष निर्भय पोहरे,महात्मा फुले स्मारक समितीचे सुरेंद्र उगले, संभाजी ब्रिगेडचे प्रदीप काळपांडे, बिरसा उलगुलान चे जिल्हाध्यक्ष विलास धोंगडे, भिमज्योत व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रवीण पोहरे, ब्ल्यु टायगर्स चे संस्थापक स्वप्निल सुरवाडे, मुकेश खंडारे, संदीप बंड, सामाजिक कार्यकर्ते दुले खान युसूफ खान, मंगेश गवई, सचिन वानखडे, निलेश खंडारे, निखिल सहस्त्रबुद्धे, सनी पोहरे, सुमेध पोहरे,मंगेश वानखडे, रत्नाकर इंगळे, कुणाल किरतकार, रुपेश पोहरे आदींची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp