अकोला न्यूज नेटवर्क दिनांक डेक्स दिनांक १६ ऑगस्ट २०२३ :- तब्बल 10-12 दिवसांच्या उघडीपीनंतर राज्यात पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. आज खानदेश आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर, विदर्भामध्ये विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी सकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरींनी हजेरीही लावली आहे. त्यामुळे चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. आता पुढे काही दिवस चांगला पाऊस झाल्यास हा पाऊस पिकांसाठी अक्षरश: जीवनदान ठरणार आहे.

मोठ्या विश्रांतीनंतर राज्यावर पावसाचे ढग.

मराठवाड्यात सरासरी पाऊस अपेक्षित

पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट केले आहे की, महाराष्ट्रात 18 ते 24 आणि 25 ते 31 ऑगस्टदरम्यान पावसाची शक्यता, विदर्भातील काही भागात आणि शेजारील, आणि शेवटच्या आठवड्यात कोकण विभागातील काही भागात शक्यता दिसते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात सरासरी पाऊस अपेक्षित आहे. आज मोठ्या विश्रांतीनंतर पुणे, नाशिक आणि सातारा, मराठवाड्यातील काही भागांसह महाराष्ट्राच्या काही भागांवर मोठ्या प्रमाणात ढग दिसले. त्यामुळे या भागात विजांचा कडकडाट, गडगडाटासह हलका ते माफक पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली, मुंबई येथे जोरदार पावसाची शक्यता आहे.

आज या जिल्ह्यांना येलो अलर्ट

आज खानदेशातील नाशिक, जळगाव, मराठवड्यातील जालना, छत्रपती संभाजी नगर, परभणी, हिंगोली नांदेड जिल्ह्यासह विदर्भातील अमरावती, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना ढगांच्या गडगडासह पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरीचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. याशिवाय कोकणातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे

पिकांना पाण्याची गरज

दरम्यान, मागील आठवड्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पिकांना पाण्याची गरज आहे. तसेच, काही भागात पावसाची उघडीप असल्याने शेती कामालाही वेग आला आहे. ऑगस्टचा दूसरा आठवडा उजडला तरीही राज्यातील बहुतांश जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यही पावसाची वाट पाहत आहेत.


Share post:

Popular

More like this
Related

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३...

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या...

घरात अचानक गजानन महाराज प्रगटले? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ :...

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये...
error: Content is protected !!