Saturday, November 9, 2024
Homeतंत्रज्ञानWhatsApp Feature : WhatsApp घेऊन येतेय नवं सिक्युरिटी फीचर्स; आता DP चा...

WhatsApp Feature : WhatsApp घेऊन येतेय नवं सिक्युरिटी फीचर्स; आता DP चा स्क्रिनशॉट काढता येणार नाही

WhatsApp Feature : WhatsApp हे जगातील सर्वात प्रसिद्ध असं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फेसबुक- इंस्टाग्रामपेक्षा व्हाटसपचा वापर करणारी मंडळी जास्त आहेत. यापूर्वी आपण व्हाटसपवर फक्त चॅटिंग आणि फोटो- विडिओ पाठवत होतो.

परंतु बदलत्या तंत्रज्ञानानुसार, कंपनीने व्हाट्सअप मध्ये अनेक बदल केले आहेत . त्यामुळे आपण आपल्या वयक्तिक काम,यासोबत ऑफिशिअल कामे सुद्धा व्हाट्सअपच्या माध्यमातून करू शकतो. एकीकडे या सुविधा देत असताना दुसरीकडे व्हाट्सअप आपल्या यूजर्सच्या सुरक्षिततेकडे सुद्धा बारकाईने लक्ष्य देत असते. त्याचाच भाग म्हणजे कंपनी लवकरच असं एक नवीन सिक्युरिटी फीचर्स आणणार आहे ज्यामुळे तुमच्या DP चा स्क्रिनशॉट काढणे इतर कोणाला शक्य नाही.

नंबर सेव्ह करावा लागेल (WhatsApp Feature)

सध्या व्हॉट्सॲपमध्ये प्रोफाईल फोटो लपवण्याचा पर्याय आहे पण प्रोफाईल फोटोचा स्क्रीनशॉट थांबवण्याचा पर्याय नाही. त्यामुळे कोणीही कोणाचाही फोटो मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकतो. आणि यूजर्सच्या सुरक्षतितेवर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. यावर उपाय काढण्यासाठी व्हाट्सअपने हे नवीन फिचर आणले आहे. WABetaInfo ने व्हॉट्सॲपच्या या नवीन फीचरची माहिती दिली आहे. रिपोर्टमध्ये असं म्हटले आहे की जोपर्यंत दोन व्यक्ती एकमेकांचे मोबाईल नंबर सेव्ह करत नाहीत तोपर्यंत ते व्हॉट्सॲपचे प्रोफाईल फोटो सेव्ह करू शकणार नाहीत आणि स्क्रीनशॉटही घेऊ शकणार नाहीत. सध्या या फीचर्सचे टेस्टिंग बीटा व्हर्जनवर सुरु असून लवकरच ते यूजर्ससाठी वापरात येईल.

दरम्यान, यापूर्वी कंपनीने व्हाट्सअप मध्ये चॅट लॉक फीचर्स (WhatsApp Feature) जारी केलं होते. यापूर्वी व्हॉट्सॲप वेब व्हर्जन मोबाइल व्हर्जनप्रमाणे लॉक केलेले नव्हते. ते फक्त लॅपटॉपच्या पासवर्डने लॉक केले जात होते, मात्र नवीन अपडेटनंतर व्हॉट्सॲप वेब व्हर्जनला सिक्रेट कोडद्वारे लॉक करता येणार आहे. त्यामुळे तुमच्या अनुपस्थित कोणी तुमचा लॅपटॉप घेतला तरी तुमच्या व्हॉट्सॲप चॅट्समध्ये प्रवेश करू शकणार नाही, त्यासाठी तुम्हाला पिन टाकावा लागेल.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp