अकोला न्युज नेटवर्क दिनांक १४ जुलै :- तुम्हीही चॅटिंग आणि मेसेजिंगसाठी व्हाट्सअँप वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. इन्स्टंट मेसेजिंग अँप व्हाट्सअँपने अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी ‘फोन नंबर प्रायव्हसी’ नावाचे नवीन प्रायव्हसी फिचर आणले आहे, जे तुम्हाला तुमचा फोन नंबर ग्रुप सदस्यांपासून लपवू देते. व्हाट्सअँप कम्युनिटी आणि ग्रुप मेंबर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन हे फीचर आणण्यात आले आहे. व्हाट्सअँप फीचर ट्रॅकर WABetainfo ने या फीचरची माहिती दिली आहे. अलीकडेच कंपनीने स्पॅम कॉल सायलेंट करण्याची सुविधा जारी केली आहे.
नवीन प्रायव्हसी फिचर काय आहे?
व्हाट्सएपच्या या फीचरच्या मदतीने कम्युनिटीमध्ये सामील होताना यूजरचा फोन नंबर सर्व सदस्यांपासून लपवला जाऊ शकतो. सध्या, कम्युनिटी अनाउन्समेंट ग्रुपने कम्युनिटी मेम्बर्सची यादी आधीच लपवलेली आहे, परंतु जर एखाद्या वापरकर्त्याने रिऍक्शनच्या माध्यमातून मेसेजमधून संवाद साधला तर, त्यांचा फोन नंबर उघड केला जातो. नवीन प्रायव्हसी फिचर अंतर्गत, हे सुनिश्चित केले जाईल की एखाद्या मेसेजवर रिऍक्शन दिल्यानंतरही तुमचा फोन नंबर लपविला जाईल. याचा अर्थ इतर कम्युनिटी युजर्स तुमचा फोन नंबर पाहू शकणार नाहीत.
बीटा वापरकर्त्यांसाठी फिचर जारी
‘फोन नंबर प्रायव्हसी’ नावाचे फिचर सर्व आणि आयओएस बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. मेटा-मालकीच्या या इन्स्टंट मेसेजिंग अँपने सर्व वापरकर्त्यांसाठी फोन नंबर प्रायव्हसी फिचर केव्हा लाईव्ह केले जाईल हे अधिकृतपणे उघड केलेले नाही. व्हाट्सअँप फिचर ट्रॅकर WABetainfo च्या अहवालानुसार, हे सर्व Android आणि iOS बीटा परीक्षकांसाठी Android आवृत्ती 2.23.14.19 आणि iOS 23.14.0.70 बीटा आवृत्तीसाठी अनुक्रमे व्हाट्सअँप बीटासह उपलब्ध आहे. नवीन फीचर अंतर्गत, फक्त कम्युनिटी मेम्बर्स त्यांचे नंबर लपवू शकतील. ग्रुप ऍडमिनचा नंबर लपवला जाऊ शकत नाही. व्हात्साप्प ने फोन नंबर प्रायव्हसी फीचरच्या रोलआउटची अधिकृत घोषणा केलेली नाही. अंतिम प्रकाशनाच्या आधी हे बदलू शकते.
स्पॅम कॉल सायलेंट करण्यासाठी फिचर
‘सायलेंट अननोन कॉलर फीचर’ हे व्हाट्सअँप नवीन प्रायव्हसी फीचर म्हणून सादर करण्यात आले आहे. मेटाच्या मते, या फीचरच्या मदतीने तुम्हाला अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्सपासून सुटका मिळेल. नवीन फीचरच्या मदतीने अनोळखी नंबरवरून येणारे कॉल आपोआप सायलेंट केले जाऊ शकतात. तथापि, वापरकर्ते नंतर कॉल टॅबमध्ये हे कॉल पाहू शकतात.