अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २५ जुलै २०२३ – WhatsApp New Feature Roll Out: Meta चे लोकप्रिय चॅटिंग अँप WhatsApp जगभरातील लाखो लोक वापरतात. मोठ्या युजर ग्रुपच्या विविध गरजा लक्षात घेऊन कंपनी नवीन फीचर सादर करते. या वर्षात WhatsApp ने अनेक नवीन अपडेट आणले आहे.
WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवीन अपडेट आणत असते. या WhatsApp चे जाळे जगभरात असंख्य ठिकाणी पसरले आहे. यावरुन आपल्या एकमेकांशी सहज संवाद साधता येतो. तुम्हीही हे चॅटिंग अँप वापरत असाल तर हे नवीन अपडेट तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
या नवीन अपडेटचा वापर हा अशा वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे जे Instagram, Threads आणि Twitter सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाखो फॉलोअर्ससह लोकप्रिय आहेत आणि त्यांच्या कामासाठी ओळखले जातात.
- व्हॉट्सअँप चॅनल फीचरची सुविधा
व्हॉट्सअँप (WhatsApp) आपल्या वापरकर्त्यांना चॅनेलची सुविधा देत आहे. या वैशिष्ट्यासह, वापरकर्ते या चॅटिंग अँपवर त्यांचे स्वतःचे चॅनेल तयार करू शकतात आणि फॉलोअर्स (Followers) जोडू शकतात. यासह, इतर व्हॉट्सअँप वापरकर्त्यांना त्यांचे आवडते चॅनेल फॉलो करण्याची सुविधा मिळणार आहे.
कंपनीने चॅनल्स फीचरसाठी (Features) नवीन अपडेट जारी केले आहे. जिथे आतापर्यंत व्हॉट्सअँप चॅनेलची सुविधा फक्त सिंगापूर आणि कोलंबियामध्ये राहणाऱ्या युजर्ससाठी उपलब्ध होती, अशातच यामध्ये आणखी काही नवीन देशांची नावेही या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. व्हॉट्सअँपने आपल्या अधिकृत ट्विटर चॅनलद्वारे या नवीन अपडेटची माहिती दिली आहे.
- व्हॉट्सअँप चॅनेलची सुविधा कोणत्या देशांसाठी सुरू करण्यात आली?
कंपनीने एका ताज्या ट्विटमध्ये माहिती दिली आहे की व्हॉट्सअँप चॅनेलची सुविधा आता आणखी 7 देशांसाठी सुरू करण्यात आली आहे. इजिप्त, चिली, मलेशिया, मोरोक्को, युक्रेन, केनिया आणि पेरू येथे राहणाऱ्या युजर्ससाठी व्हाट्सअँप चॅनल फीचर सुरू करण्यात आले आहे. मात्र, या यादीत भारताचे नाव अद्याप जोडलेले नाही. व्हॉट्सअँपच्या या सुविधेनंतर कंपनी लवकरच इतर देशांसाठीही व्हाट्सअँप चॅनेलची सुविधा सुरू करणार असल्याचे मानले जात आहे.
- याचा फायदा कसा होईल?
व्हाट्सअँप चॅनेलमुळे अनेक नवीन बिझनेस करणाऱ्यांना नव्या संधी मिळू शकतात. यामध्ये आपण आपले चॅनेलविषयी अधिक माहीती देऊ शकतो. ज्यामुळे भविष्यात लाभ होऊ शकतो असे कंपनीचे मत आहे.