Saturday, April 13, 2024
Homeमनोरंजनदोन आठवडे घाम गाळून अभिनेत्याने अंधारात शूट केले ऍक्शन सीन्स, 300 कोटी...

दोन आठवडे घाम गाळून अभिनेत्याने अंधारात शूट केले ऍक्शन सीन्स, 300 कोटी बजेटचा सिनेमा कधी होणार रिलीज?

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ जुलै २०२३ :- पुढील वर्षी म्हणजेच 2024मध्ये साऊथ इंडस्ट्रीतील एकापेक्षा एक बिग बजेट असलेले सिनेमे रिलीज होणार आहेत. त्यामध्ये ‘पुष्पा 2‘, ‘लिओ’, ‘प्रोजेक्ट के’, ‘कंगुवा’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. या सिनेमांमध्ये साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर याच्या ‘देवरा’ सिनेमाचाही समावेश आहे. बिग बजेट असलेल्या या सिनेमाची खासियत म्हणजे, हा एनटीआरचा 30वा सिनेमा आहे. या सिनेमातून बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे. या सिनेमाचे काम वेगाने सुरू आहे आणि नुकतेच सिनेमातील ऍक्शन सीन शूट करण्यात आले आहेत.

तब्बल 300 कोटी रुपयांचे बजेट
ज्युनिअर एनटीआर याच्या ‘देवरा’ सिनेमाचे दिग्दर्शन शिवा कोरतला करत आहेत. या सिनेमाचे काम वेगाने सुरू आहे. या सिनेमातील सर्वात महत्त्वपूर्ण ऍक्शन सीनचे चित्रीकरण करण्यात आले आहे. खरं तर, ‘देवरा’ सिनेमातील ऍक्शन सीन व्हीएफएक्स परफेक्ट असावा म्हणून अभिनेता आणि शिवाने सर्वप्रथम ऍक्शन सीनचे चित्रीकरण केले आहे. जेणेकरून व्हीएफएक्स टीमला एडिटिंगसाठी पुरेसा वेळ मिळेल.

कथेच्या मागणीनुसार, सीन अंधारात शूट होणार होते. अशात हैदराबाद स्टुडिओमध्ये मोठा सेट तयार करण्यात आला होता. कमी सूर्यप्रकाशात 2 आठवडे एनटीआरने सिनेमासाठी ऍक्शन सीन शूट केले आहेत. खरं तर, सिनेमात सैफ अली खान (Saif Ali Khan) याची महत्त्वाची भूमिका आहे. असे म्हटले जात आहे की, तो खलनायकाच्या भूमिकेत असेल. तसेच, जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हीदेखील लवकरच या सिनेमाची शूटिंग सुरू करेल. हा सिनेमा पुढील वर्षी 5 एप्रिल रोजी रिलीज होणार असल्याचे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!