अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १० ऑगस्ट २०२३:-कमला नेहरू नगरमधील रहिवासी असलेल्या आरोपीजवळून दोन देशी बनावट पिस्टलसह एक जिवंत काडतूस हस्तगत करून ६० हजार १०० रूपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवार, ९ ऑगस्ट रोजी केली आहे.
शहरातील लक्झरी बसस्थानक परिसरात असलेल्या कमला नेहरू नगरमधील रहिवासी यश उर्फ अजय गुलाब धुरीया याच्याजवळ दोन देशी बनावट पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असल्याची खात्रीलायक माहिती सहायक पोलिस निरीक्षक कैलास भगत यांना मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी कारवाई करून आरोपीजवळून दोन अग्नीशस्त्र व एक जिवंत काडतूस हस्तगत केले आहे.
या कारवाईत अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी यश उर्फ अजय गुलाब धुरीया वय २५ वर्ष याच्या कमला नेहरू नगर येथील घराची रात्री झाडाझडती घेऊन त्याच्या घरातून दोन देशी बनावट पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. यावेळी ६० हजार १०० रूपयांचा मुद्देमाल जप्त – केला असून आरोपीविरूध्द सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख तथा पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलिस निरीक्षक कैलास भगत, रवी खंडारे, गणेश पांडे, राजपालसिंह ठाकूर, अब्दुल माजीद, संतोष दाभाडे, ऐजाज अहमद, अमोल दिपके, प्रशांत कमलाकर, अविनाश पाचपोर, महेंद्र बलीये यांनी केली आहे. (AKOLA NEWS NETWORK