Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीआनंद मानावा की दुखः रस्त्यातच झाली महिलेची प्रसूती, दिला गोंडस मुलीला जन्म

आनंद मानावा की दुखः रस्त्यातच झाली महिलेची प्रसूती, दिला गोंडस मुलीला जन्म

ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो दिनांक 20 जुन राहुल सोनोने प्रतिनिधी वडेगाव :- वेळ दुपारी एक वाजेची उन्हाची तिव्रता वाढलेली सूर्य डोक्यावर जीवाची लाही-लाही होत असतानाच एका आदिवासी मजूर महिला अंगभाजेल अशा रस्त्यालगत सिमेंटच्या जागेवरच एका बाळाला जन्म देते ही कोणत्या चित्रपटातील कथा नाही तर आपल्या अकोला जिल्ह्यातील मन सुन्न करणारी घटना दि.१९ जून सोमवार रोजी वाडेगाव येथे घडली. महिलेची प्रसुती होणार असे लक्षात येताच परिसरातील महिला धावून आल्या अन् महिलेची सुखरूप प्रसूती करीत रुग्णालयात दाखल केले. मन सुन्न करणारी घटना. सदर घटनेचा आनंद मानावा कि दुःख असा प्रश्न पडला आहे.

शासन गरोदर मातेसाठी सुख-सोयी उपलब्ध करून देण्यासाठी लाखो रुपये खर्च करते. मात्र सुख-सोयी उपलब्ध न झाल्याने एका मजूर आदिवासी महिलेला रस्त्यावरच बाळाला जन्म द्यावा लागला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडेगाव येथील एका शेतात वाशिम जिल्ह्यातील मुंगळा या गावतील एक कुटुंब कामासाठी आले होते. महिला गरोदर होती, अचानक पोट दुखू लागल्याने गरोदर महिला पतीसोबत वाडेगाव येथील खासगी दवाखान्यात तपासणीसाठी आली. मात्र तेथे डॉक्टरांनी तिला थांबण्यास सांगितले. त्यानंतर थोड्या वेळात महिलेच्या पोटात दुखू लागल्याने तेथे उपस्थित शेत मालकाने एका आटो चालकाला तत्काळ पाठविले व महिलेला पुढील उपचारासाठी न्यावे, तोच तिच्या कळा असाह्य झाल्या.

या प्रकाराबाबत पतीने डॉक्टरांना सांगितले, परंतू त्या डॉक्टराकडून केवळ बघ्याची भूमिका घेतल्याची सांगितले. महिला बाळाला जन्म देणार ही बाब परिसरातील महिलांच्या लक्षात येताच त्या रणरागिणी धावून आल्या. महिलेला साड्यांच्या कपड्यामध्ये झाकले अन् त्यामध्येच भर उन्हात महिलेने बाळाला जन्म दिला. प्रसुती झाल्यानंतर अर्चना लोध,ललिता गजानन पल्हाडे, अलका ज्ञानदेव पल्हाडे या महिलांनी बाळाला सुखरूप उचलले.

नाळ काढता येत नसल्याने त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. आरोग्य केंद्रातही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येताच तेथे उपस्थित नागरिकांनी रोष व्यक्त केला. त्यानंतर डॉक्टरांनी प्रसुती झालेल्या महिलेकडे धाव घेऊन प्राथमिक उपचार करून आरोग्य केंद्रात नेले. त्या ठिकाणी उपचार करून अकोला येथे पाठविले. या प्रसुतीदरम्यान, ऑटोचालक चंदन नांदेकर यांच्यासह परिसरातील महिलांनी परीश्रम घेतले.

पोटात दुखू लागल्याने एक आदीवासी महिला मजूर वाडेगाव येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी गेली होती. तेथे तिला थांबण्यास सांगतिले. परंतू तेथेच रस्त्यावर तिची प्रसुती झाली. या सर्व प्रकाराकडे खासगी डॉक्टरने बघ्याची भूमिका घेतल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत होता. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनीही सुरुवातीली दुर्लक्ष केले होते. यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी महिलेला आरोग्य केंद्रात आणले व उपचार करून अकोल्याला पाठविल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!