अकोला न्युज नेटवर्क दिलीप जाधव बार्शीटाकळी दिनांक 17 जुलै :- पिंजर पोलिस स्टेशन हद्दीतील पांगरी महादेव गावात गेल्या अनेक दिवसांपासून खुलेआम दारूसह सट्टा, मटका, जुगारासारखे अवैध धंदे सुरू आहेत. ज्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन काही महिलांना वैधव्य प्राप्त झाले आहे. वारंवार मागणी करुनही दारूबंदी होत नसल्याने आज संतप्त झालेल्या गावातील विस महिलांनी रणरागिणी होऊन पिंजर पोलीस ठाण्यावर धडक दिली. गावातील सर्व प्रकारचे अवैध बंद झाले नाही तर पोलीस अधीक्षकांकडे दाद मागू, असा इशारा महिलांनी दिला.येथून पांगरी महादेव गावात गेल्या अनेक दिवसांपासून गावठी दारू खुलेआम विकली जात आहे. सोबतच सट्टा, मटका, जुगारासारख्या अवैध धंद्यांना ऊत आला आहे. अनेक कुटुंबातील कर्ता पुरुष व्यसनाधीन होत असल्याने महिलांना व लहान मुलांना त्रास होत आहे. या अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून गावातील सुमारे विस महिला पिंजर पोलीस ठाण्यात आल्या.
आमच्या येथील दारूविक्री बंद करा’ अशी मागणी करीत महिलांनी पिंजर पोलिसांना निवेदन दिले, यावेळी पिंजर पोलिस स्टेशनचे पीएसआय बंन्डू मेश्राम,पिंजर बीटचे जमादार रमेश पाटील खंडारे यांना निवेदनही दिले. उपस्थित महिलांनी आपल्या व्यथा मांडताना अवैध धंद्यांमुळे तरुणाई व्यसनाच्या आहारी गेले असून . काहींनी दारु विक्रेत्यांपासून संरक्षण द्यावे, अशी साद घातली. अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन दिले. पोलीस असे सांगून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचेही आश्वासन दिले.