अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २९ जुलै २०२३:-कर्मवीर आधुनिक शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष मिलिंदजी झाडे यांच्या उदात्त प्रयत्नातून आणि सचिव नितिनजी झाडे यांच्या कठोर मेहनतीतून आस्की किड्स चा शिक्षण संस्कार उभा राहिला जो नेहमी सर्वांगाने सबळ असे नागरिक घडविण्यात आपले इतिकर्तव्य मानतो. ह्यावेळी आस्कीचे सचिव नितिन झाडे यांनी मुलांच्या मनात राजकीय प्रगल्भता निर्माण व्हावी, राजनैतिक सिद्धांत त्यांच्यात रुजावे, कायद्याचे ज्ञान त्यांना मिळावे,

प्रशासनव्यवस्था त्यांनी जवळून अनुभवावी असे विविध उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र विधानमंडळ” चा मुंबई येथे अभ्यास दौरा “इतिहास- नागरिकशास्त्र” विषयाअंतर्गत आयोजित केला.ज्यासाठी अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी मा. प्रकाशजी भारसाकळे यांनी सदर अभ्यास दौऱ्याची जबाबदारी स्वीकारून मुंबई येथे शाळेला सर्वतोपरी मदत करून आपल्या समर्पक लोकप्रतिनिधी असल्याची प्रचीती दिली. सदर दौऱ्यासाठी वर्ग ८ वी च्या एकूण ४५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. ज्यामध्ये अथर्व भगत,सार्थक भगत,आयुष उकळकर,हिमांशू सिरस्कार,निरज हिवाळे,उज्ज्वल गुजर, अथर्व वणकर, ओम हाडोळे, कृष्णा हाडोळे, आराध्य लाडोळे, चैतन्य बोंद्रे, अनिकेत काळे, आर्यन नागरे, ओम मानकर, शौर्य ठाकूर, वेदांश अग्रवाल, सिबगत पटेल, समर्थ शिंदे, अनिरुध्द पंत, समर्थ गणोरकर, सुदैश मिर्झा, मयूर ठोकळे, अथर्व लटकुटे, दक्ष मगरे, कृष्णा सिरस्कार, परी फुलारी, चारुल गुप्ता, कृतिका टावरी, पूर्वा लांडे, श्रावणी सिरस्कार, पूर्वा हरणे, कृष्णाई सावरकर, मृणाली तायडे, विशाखा मोहोड, लावण्या टापरे,तनुष्का गायगोले,गौरी सदाफळे,प्राची कुटे,ईश्वरी वाघमारे,गौरी कतोरे,श्रावणी धर्मे, रिद्धी पोटदुखे,आनंदी नर्वस,आणि भक्ती मेहरे यांचा समावेश होता.

यावेळी मुलांनी मंत्रालय येथे भेट देऊन प्रशासनिक बाबींची माहिती मिळवली नंतर विधिमंडळ येथे भेट देऊन कायदा निर्मिती प्रक्रिया समजून घेत सभागृह कामकाज पद्धती समजून घेतली. सोबतच विद्यार्थ्यांनी गेट वे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय येथे सुध्दा भेट दिली.यावेळी मुलासोबत सदर अभ्यास दौऱ्याला शाळेचे ज्येष्ठ इतिहास शिक्षक तथा अकॅडमिक हेड पवन चितोडे, मनीष सरकटे, रुपाली मानकर, अरुणा काळे, राहूल पालेकर आणि पार्थ झाडे यांची उपस्थिती होती.


Share post:

Popular

More like this
Related

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३...

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या...

घरात अचानक गजानन महाराज प्रगटले? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ :...

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये...
error: Content is protected !!