अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २८ ऑगस्ट २०२३:-भारताचा गोल्डनबॉय भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली. वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics Championship 2023) नीरजने भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली आहे.या विजयासह वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा निरज हा पहिलाच भारतीय ठरला आहे. नीरज चोप्राने 88.17 मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर, पाकिस्तानी खेळाडू नदीम अर्शद दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्याला रौप्यपदक जिंकण्यात समाधान मानावे लागले. हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात सुरू असलेल्या वर्ल्ड ॲथेलेटिक्स चॅम्पियनशिपच्या शेवटच्या दिवशी नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले आहे.

नीरज चोप्रा दुसऱ्या फेरीनंतर 88.17 मीटरसह अव्वल ठरला. त्याचवेळी जर्मनीचा ज्युलियन वेबर दुसऱ्या फेरीत 85.79 मीटर फेक करून दुसरा आला. या फेरीनंतर झेक प्रजासत्ताकचा जेकोब वडलेच 84.18 मीटर गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. दुसऱ्या स्थानी पाकिस्तानचा अरशन नदीम राहिला. त्याने तिसऱ्या प्रयत्नात बेस्ट थ्रो केला. भालाफेकीत नीरज चोप्राशिवाय भारताचे डीपी मनु आणि किशोर जेना हेसुद्धा फायनलमध्ये होते. मात्र किशोर पाचव्या तर मनु सहाव्या क्रमांकावर राहिले.भारतासाठी वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ट्रॅक अँड फिल्ड कॅटेगरीत मिळालेलं हे पहिलं सुवर्णपदक आहे. त्याच्याआधी अंजू बॉबी जॉर्ज हिने 2003 मध्ये लांब उडी प्रकारात कांस्य पदक जिंकलं होतं. तर नीरज चोप्राने 2022 मध्ये रौप्य पदक पटकावलं होतं.


Share post:

Popular

More like this
Related

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३...

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या...

घरात अचानक गजानन महाराज प्रगटले? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ :...

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये...
error: Content is protected !!