अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-कधी झाली जागतिक पर्यटन दिवसाची सुरूवात जागतिक पर्यटन दिवसाची सुरुवात 1970 पासून संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेद्वारे केली गेली. त्यानंतर 27 सप्टेंबर, 1980 रोजी पहिला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला.तेव्हापासून दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो.काय आहे जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्यामागचा उद्देश पर्यटनाला चालना देणे हा, जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे.
या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊ शकेल. लोक जेव्हा फिरायला जातात, तेव्हा तेथेच थांबतात, खातात-पितात आणि खरेदीही करतात. यामुळे पर्यटन आणि रोजगारालाही चालना मिळते. पर्यटनाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आणि या क्षेत्राला चालना देण्यासाठी, दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. लोकांना पर्यटन स्थळांकडे आकर्षित केले जाते.