अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ३१ जुलै२०२३ :-बाबरी मशीदीनंतर आता देशभरात ज्ञानवापीवरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. हिंदुत्ववादी गट न्यायालयात गेला आहे. कनिष्ठ न्यायालयाने सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते, त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिला आहे. असे असताना आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इशारा दिला आहे.ज्ञानवापीला मशीद म्हणालात तर वाद होणार असा इशारा योगी यांनी दिला आहे. ज्ञानवापीमध्ये अनेक देव देवतांच्या प्रतिमा आहेत. या प्रतिमा हिंदूंनी ठेवलेल्या नाहीत. जर ज्ञानवापीला मशीद म्हणालात वाद होणारच आहे. तिथे त्रिशुळ काय करतोय, असे आदित्यनाथ म्हणाले.
सरकारलाही ज्ञानवापी वादावर तोडगा काढायचा आहे. मुस्लिम समाजाकडून ऐतिहासिक चूक झाली आहे, ती सोडवण्यासाठी मुस्लिम समाजाने पुढे आले पाहिजे, असे योगी म्हणाले. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत योगी यांनी हे वक्तव्य केले आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या मूळ गावी गोरखपूरमध्ये आहेत. आज दुपारी तीनच्या सुमारास अनेक्सी भवन सभागृहात ते उद्योजकांची बैठक घेणार आहेत. यानंतर ते दुपारी ४ वाजता शासकीय आंतर महाविद्यालयांच्या प्राचार्यांना संबोधित करतील. तत्पूर्वी सकाळी मुख्यमंत्री प्रधानमंत्री आवास योजनेच्या नागरी लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी पाठवतील. सायंकाळी जिल्हा न्यायालयात आयोजित कार्यक्रमात वकिलांच्या हस्ते चेंबरचे उद्घाटन होणार आहे.