अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ :- Supermoon 2023 : ऑनलाइन फूड डिलीव्हरी कंपनी झोमॅटो सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी ती जाहिरातींमुळे वादात राहते तर कधी त्यांच्या डिलीव्हरी बॉयच्या विविध कृत्यांमुळे कंपनीची चर्चा सुरु असते. अशातच आता पुन्हा एकदा Zomato च्या ट्विटची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. जे वाचल्यानंतर अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण होत आहे.
झोमॅटोने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला कॅश ऑन डिलिव्हरीवर फूट पाठवणे थांबवण्याचे आवाहन केले आहे. यामागे Zomato ने दिलेले कारण खूपच मजेशीर आहे. झोमॅटोच्या ट्वीटनुसार, ‘अंकिता’ तिच्या एक्स बॉयफ्रेंडला कॅश ऑन डिलिव्हरी (COD) मोडवर सतत फूड पाठवत होती. म्हणजे या ऑर्डरचे पैसे ‘अंकिता’च्या एक्स बॉयफ्रेंडने देणे अपेक्षित आहे. पण अंकिताचे एक्स बॉयफ्रेंड ऑर्डरचे पैसे देण्यास नकार देत होता. हे एक-दोनदा नाही तर तीन वेळा घडले.
अखेर याबाबत झोमॅटोनेच ट्वीट केले आहे. झोमॅटोने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, भोपाळमधील अंकिता कृपया तुमच्या एक्स बॉयफ्रेंडला कॅश ऑन डिलिव्हरीवर अन्न पाठवणे थांबवा. तिसऱ्यांदा तो पैसे देण्यास नकार देत आहे. भोपाळच्या अंकिताला ट्विटद्वारे आवाहन करत, झोमॅटोने 2 ऑगस्टला ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये लिहिलं आहे की ‘भोपाळची अंकिता, आता बस करा.
तुमच्या एक्स बॉयफ्रेंडसाठी कॅश ऑन डिलिव्हरीवर जेवण ऑर्डर करणं थांबवा. तुमच्या एक्सने आम्हाला पैसे देण्यास नकार दिल्याची ही तिसरी वेळ आहे’. झोमॅटो अनेकदा मनोरंजक पोस्ट करत असते.अशा परिस्थितीत लोकांना प्रश्न पडला आहे, खरोखरच अंकिता नावाच्या मुलीने झोमॅटोला वैताग दिला आहे. की, मजा घेण्यासाठी त्यांनी स्वत:हून या पात्राची कल्पना केली आहे? प्रकरण काहीही असलं तरी झोमॅटोची ही अनोखी पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.