अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २६ जुलै २०२३ – सबसे कातील गौतमी पाटील हे वाक्य आता सर्व युववर्गाचा तोंडात बसले आहे पण ह्याच गौतमी पाटीलचा कार्यकाळ ज्यास्त दिवस टिकणार नसून यावर दोन मोठे निर्णय मोडनिंब च्या बैठकीत घेण्यात आले आहेत. जिल्ह्यातील मोडलिंब येथे आज राज्यस्तरीय तमाशा कलावंतांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
यामध्ये 18 वर्षांच्या खालील मुलींना तमाशा केंद्रात कलावंत म्हणून आपली कला सादर करता येणार नाही. तसेच तमाशा थिएअटरमध्ये डीजेला बंदी करण्यात आली असल्याची माहिती वसंत गाडे यांनी दिली. डीजे संस्कृती नाट्यकलेला लागलेला कलंक आहे, असे म्हणत गौतमी पाटीलवर निशाणा साधला.
गौतमी पाटीलवर निशाणा
मोडलिंब येथे राज्यस्तरीय तमाशा कलावंत, केंद्र मालक, पार्टी मालकीण, स्त्री पुरुष कलावंत यांची राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रमुख दोन निर्णय घेण्यात आले. यामध्ये 18 वर्ष मुलींना मुलांना तमाशा थिएटरमध्ये आपली कला सादर करता येणार नाही. त्याचबरोबर तमाशा थिएटरमध्ये यापुढे डीजेचा वापर होणार नाही, असा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी गौतमी पाटीलचा डीजे लाऊन चाललेला धांगडधिंगा फार वर्ष चालणार नाही, असे म्हणत मूळ तमाशा थिएअटरमध्ये परंपरागत लावणी शेवटपर्यंत कायम राहील, असा विश्वास लावणी कलावंत वैशाली वाफळकर यांनी केला आहे. तमाशा कलावंतांना समाजामध्ये तेवढाच मान सन्मान मिळायला हवा. त्याचबरोबर या कलावंतांच्या मुलांना शिक्षण सन्मानाने घेता यावे यासाठी सरकारने आम्हाला पाठबळ देणे गरजेचे आहे, असंही मत त्यांनी व्यक्त केलं.
गौतमी पाटील पुन्हा चर्चेत
गेल्या काही महिन्यांपासून गौतमी पाटील या ना त्या कारणामुळे सातत्याने चर्चेत आहे. गौतमी पाटीलचा एका अश्लील हावभाव केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर गौतमी पाटील पहिल्यांदा प्रकाश झोतात आली. त्यादिवसापासून गौतमी पाटील नेहमी चर्चेत आहे. त्या प्रकारानंतर गौतमीने सर्वांची माफी मागून तशी चूक पुन्हा होणार नाही, असं आश्वासन दिलं होतं. बऱ्याचदा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी केलेल्या राड्यामुळेच ती चर्चेत असते. सोलापूरमध्ये तर गौतमी पाटील विरोधात एका आयोजकाने गुन्हा दाखल केली होती. तर अनेक ठिकाणी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामुळे आयोजकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आता तमाशा कलावंतांनी गौतमी पाटीलवर टीका केल्यानंतर ती याला काय उत्तर देते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी ANN न्युज नेटवावर्क वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट ANN News Network नेटवर्क वर.