अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो अनिस शेख प्रतिनिधी महान दिनांक ३० जुलै २०२३ – अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात येत असलेल्या महान येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली. घरामधील कुलर मध्ये विद्धुत शॉक लागल्याने पती पत्नी चा मृत्यू झाल्याची घटना महान येथे 30 जुलै रोजी दुपारी घडली. अल्प भूधारक शेतकरी पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

पिंजर पोलीस आतर्गत हद्दीत येणारे महान हे गाव या गावात धरण असल्याने प्रत्येकालाच हे गाव माहिती आहे याचं गावात प्रभाकर बाप्पुराव जनोरकार पत्नी निर्मला प्रभाकर जानोरकार यांच्या सोबत गुण्या गोविंदाणे संसार करत होते. घरची हलाकीची परिस्थिती पदरी एकही मुलबाळ नाही फक्त दोन ऐक्कर शेती असून हिच शेती करत आपल्या संसाराचा गाडा हे दाम्पत्य राबवत असे. मूल बाळ नसून देखील सम्पूर्ण गावात मिळून मिसळून राहणाऱ्या ह्या दोघांच्या संसाराचा गोडवा वरच्याला देखील मान्य नव्हता की काय? असा देव निष्ठुर झाला आणी एका झटक्यात दोघांना देखील घेऊन गेला.

अशी घडली घटना क्षणात होत्याच नव्हतं झाला

स्थानिक महान येथील रहिवासी प्रभाकर बाप्पुराव जनोरकार 70 वर्ष व त्यांची पत्नी निर्मला प्रभाकर जानोरकार 65 वर्ष हे पाटील पुऱ्यात वास्तविक होते. आज 30 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता प्रभाकर जानोरकार हे शेतातून काम करून घरी परतले असता त्यांना घराचे दार आतून लावलेले दिसले खिडकीतून डोकावून पाहलें असता त्यांची पत्नी कुलर च्या पाठीमागे खाली पडलेली दिसली या वरून आपल्या पत्नी ला नेहमी चक्कर येत असल्याने तिला चक्कर आल्यामुळे ती खाली पडली असावी असा विचार त्यांचे मनात आल्याने त्यांनी उदय जानोरकार आणि आशिष पोफळे यांचे मदतीने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.

मात्र दरवाजा तुटत नसल्याने त्यांनी घरामागील दरवाजा मधून आत प्रवेश केला. पत्नीला उचलण्यासाठी ते कुलर चे समोरून जात असताना त्यांच्या हाताचा स्पर्श कुलर ला झाल्याने ते सुद्धा कुलर ला चीपकले आणि जोराने कल्ला केला. खिडकीतून पाहत असलेले आशिष पोफळे आणि उदय जानोरकार यांचे लक्षात आले की कुलर मध्ये शॉक आहे. लगेच त्यांनी घराबाहेरील मिटर वरती काट्या मारल्या परंतु वीज प्रवाह खंडित झाला नाही. शेवटी सर्व्हिस लाईन वरती काट्या मारल्याने वीज प्रवाह बंद होताच प्रभाकर जानोरकार हे कुलर चे पाण्याच्या टपाकडे फेकल्या गेले.

उपस्थित नागरिकांनी दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश केला असता तो पर्यंत ते दोघेही ठार झाले होते.मृतक निर्मला जानोरकार यांचे उजव्या हाताला शॉक लागल्याारखा जळलेले दिसले. त्यांना दुपार चे वेळेस शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांचे शरीरावरून दिसून येत असल्याचे बोलल्या जात आहे. मृतकाचे पती प्रभाकर जानोरकार यांचे कडे दोन एकर शेत असून त्यांना एकही अपत्ये नसून ते दोघे पती पत्नी त्या दोन एकर शेती वरच आपला जीवनाचा रणगाडा चालवायचे.

आज घटनेच्या दिवशी नेहमी प्रमाणे प्रभाकर जानोरकार हे शेता मध्ये गेले होते. सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास ते घरी परतले होते.कुलर पासून शॉक लागल्याने कुलर जमिनीवर उलटे पडलेले दिसून आले.हे दोघे पती,पत्नी मन मिलाऊ स्वभावाचे असल्याने त्यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण महान गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. मृतक पती पत्नी यांनी आपल्या मनात थोडा ही विचार केला नसेल कि काळाचा घाला दोघांची एकाच दिवशी आणि सोबतच जगातून सुटका करणार.

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार राहुल वाघ, पी एस आय. बंडू मेश्राम महान पोलीस चौकी चे जमादार बेलूरकर व त्यांचे सहकारी घटणास्थळावर पोहचले मृत्कांचा पंचनामा करून शव विच्छेदन करिता मूर्तिजापूर रुग्णालयात पाठविले.या प्रकरणी मर्ग चा गुन्हा दाखल करण्यात आला.


Share post:

Popular

More like this
Related

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३...

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या...

घरात अचानक गजानन महाराज प्रगटले? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ :...

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये...
error: Content is protected !!