Saturday, July 20, 2024
Homeराजकीयया सुपरस्टारची राजकारणात दमदार एंट्री, थेट पक्षाची स्थापना आणि ही अत्यंत मोठी...

या सुपरस्टारची राजकारणात दमदार एंट्री, थेट पक्षाची स्थापना आणि ही अत्यंत मोठी घोषणा

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ फेब्रुवारी २०२४:- आता नुकताच एका मोठ्या अभिनेत्याने राजकारणात दमदार अशी एंट्री केलीये. विशेष म्हणजे या अभिनेत्याने कोणत्याही पक्षात वगैरे प्रवेश न करता थेट स्वतः चा पक्षच स्थापन केलाय. विशेष म्हणजे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काही मोठ्या घोषणा देखील केल्या आहेत. अभिनेत्याने राजकारणात प्रवेश करताच अनेकांचे धाबे दणाणले आहेत. साऊथचा सुपरस्टार थलापती विजय याने राजकारणात प्रवेश केलाय. थलापती विजय याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची माहिती दिलीये. फक्त माहितीच नाही तर या पोस्टसोबतच त्याने काही मोठ्या घोषणा केल्याचे बघायला मिळतंय.

थलापती विजय याने केलेल्या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण हे बघायला मिळतंय. थलापती विजय याने त्याच्या पार्टीचे नाव देखील जाहिर केलंय. हेच नाही तर आगामी निवडणूकांबद्दलही त्याने मोठी घोषणा केलीये. आता सोशल मीडियावर थलापती विजय याने शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसतंय.

तमिलागा वेत्री कझगम हे विजय थलापती याच्या पार्टीचे नाव आहे. तसेच थलापती विजय याच्याकडून हे देखील जाहिर करण्यात आलंय की, 2024 ची लोकसभा निवडणूक त्याचा पक्ष लढणार नाहीये. हेच नाही तर ते कोणत्याही पार्टीला या निवडणूकीमध्ये समर्थन देणार नाहीत. थलापती विजय याच्या पार्टीचे लक्ष हे 2026 ची निवडणूक आहे.

थलापती विजय याने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले की, सर्वसाधारण आणि कार्यकारी परिषदेच्या बैठकीत आम्ही हा निर्णय घेतला आहे. तमिलगा वेत्री कळघम पक्षाची नाव नोंदणी करण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे निवेदनही दिले आहे. आमचे लक्ष हे 2026 च्या विधानसभा निवडणुका लढवणे आणि जिंकणे आहे. जनतेला हवे असलेले मूलभूत राजकीय बदल घडवून आणायचे आहेत. म्हणजेच काय तर 2024 लोकसभा लढल्या जाणार नाहीत. थलापती विजय याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका या केल्या आहेत. थलापती विजय याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग ही बघायला मिळते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp