अकोला न्यूज नेटवर्क धनराज सपकाळ प्रतिनिधी मुर्तीजापुर दिनांक ०३ फेब्रुवारी २०२४:- मुर्तीजापुर येथील शेलु येताळ येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वेताळ महाराज यांच्या यात्रा महोत्सव निमित्त श्रीमद् भागवत सप्ताहाला सुरुवात झाली आचार्य श्री मनीष शास्त्री शिवनकर मुर्तीजापुर यांच्या मार्गदर्शनाखाली पौरोहित्य व यज्ञ सहकार करण्यात आले,श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते ह भ प श्री लक्ष्मण महाराज कराड यांच्या मधुर वाणीतून करण्यात आली भागवत कथेला साथ संगत करणारी मंडळी गायनाचार्य हरिभक्त श्री हनुमंत महाराज एकनाथ आळंदीकर ह भ प श्री गोपाल महाराज बुरघाटे ऑर्गन वादक ह भ प श्री अंकित महाराज देशमुख ऑक्टो पॅड वादक ह भ प श्री लखन महाराज केवट तबलावादक ह भ प श्री ऋषिकेश महाराज सरोदे ह भ प ऋषिकेश महाराज सरोदे, झाकी कार ह भ प श्री सुमित महाराज मेश्राम
आयोजक श्री वेताळ महाराज संस्थान व समस्त गावकरी मंडळी असे संस्थेचे अध्यक्ष श्री राजूभाऊ वासुदेवराव सरदार यांनी कळविले तसेच मुर्तीजापुर ग्रामीणचे ठाणेदार नितीन जी राऊत पोलीस सहकार्यासह यात्रेत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या यात्रेला पंचकोशीतील नागरिकांची मोठी गर्दी असते. यात्रेत वेताळ बाबाची भक्तांवर अनेक प्रकारचे चमत्कार भक्तांना घडले आहे. भाविकांची गर्दीने शेलू वेताळ येथे चांगल्या प्रकारे कार्यक्रम पार पडला विशेष प्रतिनिधी धनराज सपकाळ सह कॅमेरामन नरेंद्र वाढोनकर अकोला.