Tuesday, May 21, 2024
HomeमनोरंजनPushpa 2 The Rule पायात घुंगरू, कानात डुल, गळ्यात पुष्माळ हातात त्रिशूल,...

Pushpa 2 The Rule पायात घुंगरू, कानात डुल, गळ्यात पुष्माळ हातात त्रिशूल, अल्लू अर्जुन करणार तांडव, जबरदस्त ॲक्शन असलेला पुष्पा २ चा टिजर रिलीज

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक :- गेल्या अनेक दिवसांपासून अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. Pushpa 2 The Rule ‘पुष्पा 2’ सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून ट्विटरवर ट्रेंड करतोय. गेल्या २ – ३ दिवसांपासून ‘पुष्पा 2’ चे अनेक पोस्टर बाहेर येत आहेत.

रश्मिका मंदानाच्या वाढदिवशी तिचा लूक रिव्हिल करण्यात आला. तर दुसरीकडे हातात त्रिशूळ, गुलाल असा खास लूकमध्ये अल्लू अर्जुनची झलक दिसली. आता सर्वांना ज्याची उत्सुकता होती अशा Pushpa 2 The Rule ‘पुष्पा 2’ चा टिझर भेटीला आलाय.

टिझरमध्ये अल्लू अर्जुनचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळतो. ‘फ्लावर नही फायर’ असं म्हणणारा पुष्पा दुसऱ्या भागात आणखी खुनशी आणि जबरदस्त अंदाजात दिसतोय. पुष्पा गुंडांना लोळवताना दिसतोय. पायात घुंगरु बांधून अन् चापून चोपून साडी नेसून पुष्पाच्या भूमिकेत अल्लू अर्जुन गुंडांना लोळवताना दिसतोय.

 पुष्पाची दहशत इतकी आहे की त्याला गुंड घाबरताना दिसतात. १ मिनिटं ८ सेकंदांचा हा टिझर भन्नाट झालाय यात शंका नाही. पहिल्या भागात पुष्पाने जिच्याशी लग्न केलं ती श्रीवल्ली अर्थात रश्मिका मंदाना सुद्धा दुसऱ्या भागात भन्नाट अवतारात दिसतेय. रश्मिका आणि अल्लू अर्जुन यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा गाजणार यात शंका नाही.

Pushpa 2 The Rule ‘पुष्पा 2’ बद्दल सांगायचं तर भारतीय मनोरंजन विश्वातील हा एक बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. गेल्या २ वर्षांपासून ‘पुष्पा 2’ ची उत्कंठा शिगेला आहे. अल्लू अर्जुन सिनेमात पुष्पाच्या प्रमुख भुमिकेत झळकणार आहे. तर रश्मिका श्रीवल्लीच्या भुमिकेत दिसणार आहे. याशिवाय फहाद फाजिल सिनेमात पोलीस अधिकारी भवरच्या भूमिकेत पुन्हा भाव खाऊन जाईल यात शंका नाही. ‘पुष्पा 2’ सिनेमा १५ ऑगस्ट २०२४ ला रिलीज होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!