Sunday, February 25, 2024
Homeराष्ट्रीयअल्पवयील व्यक्तीशी संमतीने Sex करणं म्हणजे बलात्कार नव्हे; कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

अल्पवयील व्यक्तीशी संमतीने Sex करणं म्हणजे बलात्कार नव्हे; कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणत्याही अल्पवयीन मुलीसोबत जर तिच्या संमतीने शरीरसंबंध ठेवले तर याचा अर्थ त्याने बलात्कार केला असा होत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय ओडिसा उच्च न्यायालयाने दिला आहे. एका लैंगिक अत्याचाराच्या खटल्याप्रकरणी न्यायमूर्ती एस के साहू यांनी १० वर्षे कैद असलेल्या आरोपीची निर्दोष सुटका करत मोठी टिप्पणी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, एका १७ वर्षीय मुलीच्या वडिलांनी शंतनु कौडी या व्यक्ती विरोधात बलात्काराचा गंभीर आरोप लावला होता. त्यामुळे पोलिसांकडून शंतनु याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाच्या पाच वर्षांनंतर सत्र न्यायालयाने शंतनुला कारागृहाची शिक्षा सुनावली होती. परंतु २०१९ मध्ये या खटल्याला उच्च न्यायालयात पुन्हा आवाहन देण्यात आले.

उच्च न्यायालयाच्या सुनावणीदरण्यान समोर आले की, या १७ वर्षीय मुलीला शंतनुचे लग्न झाले असल्याचे आधीच माहित होते. तसेच शंतनुला कधी आपल्यासोबत लग्न करता येणार नाही हे देखील तिला माहित होते. मात्र तरी तेथील तिने स्वमर्जीने शंतनुसोबत शरीरसंबंध ठेवले. ती त्याला रोज भेटत राहिली. आणि एकमेकांच्या संमतीने शरीरसंबंध ठेवले. यामुळे शंतनुने मुलीशी जबरदस्ती केल्याचे उघड होत नाही हे न्यायालयाने स्पष्ट केले.

तसेच, या दोघांमध्ये सर्व काही संमतीने झाले आहे. याला कोणीच विरोध दर्शवला नाही. अशी सर्व माहिती मुलीनेच आपल्या स्टेटमेंटमध्ये दिली आहे. त्यामुळे शंतनु विरोधात कोणताही खटला चालवला जाऊ शकत नसल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. दरम्यान हे सर्व प्रकरण तब्बल दहा वर्षे चालल्यामुळे शंतनुची १० वर्षांनी सुटका करण्यात आली आहे. तसेच एखादी अल्पवयीन मुलगी स्वमर्जीने शरीरसंबंध ठेवत असेल तर यात कुठे ही तिच्यावर बलात्कार झाला असल्याचे सिध्द होत नाही असे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने निकालाअंती दिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!