अकोला न्युज नेटवर्क दिनांक २४ जुलै :- हर घर सावरकर’, अभियानातंर्गत शिवसेना-भाजप युतीवतीने शहरातील प्रमिलाताई ओक सभागृहात रविवारी घेण्यात आलेल्या सागरा प्राण तळमळला या नाटकाच्या प्रयोगास अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या नाटकातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ज्वाजल्य देशभक्ती व स्वातंत्र्यासाठी असलेल्या त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आला.
अकोला अकोला महानगर व – जिल्हा शिवसेनेच्या शिंदे गट व भाजप च्या वतीने स्थानिक प्रमिलाताई ओक हॉल येथे आजच्या युवा पिढीच्या मनातं ज्वलंत राष्ट्रप्रेमाचे बिजारोपण करण्याच्या राष्ट्रहेतुने स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर याच्या जीवनाचरीत्रावर आधारित नाट्य ‘सागरा प्राण तळमळला'” या नाटकाचे आयोजन करण्यात आले. या नाट्यप्रयोगाला अकेलेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी अकोला पालकमंत्री शिंदे शिवसेना गटाचे संपर्क नेते तथा खासदार प्रतापराव जाधव, जिल्ह्याचे संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच माजी महापौर विजय अग्रवाल, भाजपचे महानगर अध्यक्ष जयंत मसने, शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख संदीप पाटील, जिल्हाप्रमुख अश्विन नवले, विठ्ठल सरप योगेश अग्रवाल, शशिकांत चोपडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. नाटकातील कलाकारांच्या अभिनयाने अकोलेकरायची मने जिंकली असून नाटक पाहण्यासाठी शहरातील गणमान्य नागरिकांनी मोठ्या संख्येत हजेरी लावली. कार्यक्रमाचे संचालन महानगरप्रमुख योगेश अग्रवाल यांनी केले. यावेळी शहरातील नागरिक व शिवसैनिकांची या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.