अकोला न्युज नेटवर्क दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ :- विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शिक्षकांचे किमान तास निश्चित करण्यात आलेले आहेत. या नवीन पत्रानुसार शाळेव्यतिरिक्त शिक्षकांना दररोज अडीच तास जादा द्यावे लागणार आहेत. याची अंमलबजावणी येत्या १ मार्चपासून करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी काढलेल्या पत्रकात नमूद केले आहे. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकारी अधिनियम २००९ अन्वये शिक्षकांसाठी प्रत्येक आठवड्याला शाळेतील कामाचे तास व शाळाबाहेरील चिंतन व अभ्यासाचे तास निश्चित करण्यात आले आहेत. यात प्रत्येक शिक्षकासाठी दर आठवड्याला पाठाची तयारी करण्यासह अध्यापनाचे ४५ तास निश्चित केले आहेत. यात शाळाबाहेरील चिंतन व अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी १५ तास व प्रत्यक्ष शाळेतील शिकविण्याचे किमान ३० तासांचा समावेश असेल, पाठाची तयारी करण्यासाठी दररोज १५० मिनिटे म्हणजे २ तास ३० मिनिटे देणे आवश्यक असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, १ मार्च ते ३० एप्रिल २४ अखेरपर्यंत शालेय वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी १२.४५, तर शनिवारी सकाळी ७.२५ ते सकाळी ११.३० अशी राहणार आहे. मात्र शिक्षकांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ३.१५ तसेच शनिवारी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत काम करावे लागणार आहे. दररोजच्या अडीच तासात शिक्षकांनी पाठासाठी मुद्देनिहाय माहिती संकलित करावी लागेल. त्याचबरोबर अध्ययन व अध्यापनविषयक साहित्य तयार करणे, पाठाचे टाचण तयार करणे, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनविषयक नोंदी, तंत्रे विकसित करणे, प्रत्यक्ष मूल्यांकन करणे, मुलांना शिकविण्याच्या दृष्टीने चांगले ज्ञानयुक्त पुस्तके वाचणे, अभ्यासात मागे असलेल्या मुलांना प्रगत करण्यासाठी प्रयत्न करणे आदींचा समावेश आहे. अध्यापनाचे तास व पाठाच्या तयारीसाठी असलेले तास कोणत्याही परिस्थितीत कमी होणार नाही. प्रभावी अंमलबजावणी करावी, असे चारही तालुक्यांच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. या संदर्भात शिक्षक संघटनांनी विरोधाचे अस्त्र उपसले त्याचा उपयोग झालेला नाही.
नवीन शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम राबवा
शैक्षणिक वर्ष अवघे दोन महिने शिल्लक आहे. त्यातच आगामी काळ हा उन्हाळ्याचा आहे. त्यामुळे अशा कडक उन्हात शिक्षकांना जादा तास काम करायला लावणे योग्य नाही. नवीन शैक्षणिक वर्षापासून याची अमलबजावणी झाली असती तर त्याचा जास्त लाभ झाला असता, शिक्षकांनाही तयारी करायला वेळ मिळाला असता, असेही काही
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आरटीई कायद्यांतर्गत शिक्षकांना आता रोज अडीच तास जादा काम करावे लागणार आहे. यापूर्वी शिक्षक आठवड्यातून ३० तास काम करीत होते, ते आता ४५ तास करावे लागणार आहे. याची अंमलबजावणी येत्या १ मार्चपासून करण्यात येणार आहे. शुभम गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे शिक्षण विभागाने शिक्षकांच्या मानसिक स्थितीचा विचार न करता अतिशय घाईघाईने हा निर्णय घेतला आहे. विचार करून निर्णय घेतला असता तर त्याचे निश्चित स्वागत केले असते. अजुनही या निर्णयाचा फेर विचार व्हावा, या निर्णयाची नंतर अंमलबजावणी करावी.