Saturday, May 4, 2024
Homeब्रेकिंगट्रकच्या धडकेने माकड गंभीरित्या जखमीमा चंडिका आपत्कालीन पथकाने उपचारस नेऊन  जीवनदान दिले

ट्रकच्या धडकेने माकड गंभीरित्या जखमीमा चंडिका आपत्कालीन पथकाने उपचारस नेऊन  जीवनदान दिले

अकोला न्यूज नेटवर्क डेस्क :-  दि. 18 :  अमरावती राष्ट्रीय महामार्ग सहा येथे मुर्तिजापूर जवळ एका ट्रकाच्या धडकेने एक माकड गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना घडली होती यावेळी काटेपूर्णा येथील मा चंडिका आपातकालीन पथक सदस्य विजय मालटे आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी या गंभीर रित्या जखमी असलेल्या माकडाला मूर्तिजापूर येथे उपचारासाठी दाखल केले होते

आपात्कालीन परिस्थितीत सध्या मा चंडिका आपत्कालीन पथक यांनी आपले कार्य आणि हिमतीचे धाडस दाखवून आपले नाव जिल्ह्यातलौकिक केले आहे तसेच आजच्याच घटनेने अपघाती परिस्थितीतही मनुष्य असो किंवा प्राणी आपले कार्य हे सजीवांच्या रक्षणासाठी आहे हे दाखवून मा चंडिका आपत्कालीन पथकाचे सदस्य यांनी एका माकडाचा जीव वाचवला आहे अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग सहा मुर्तीजापुर जवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेने एका रस्ता ओलांडणाऱ्या माकडा ची गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना घडली होती .

 अमरावती येथे काही कारणा निमित्त जात असलेले  चंडिका आपातकालीन पथकाचे सदस्य विजय मालटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या जखमी झालेल्या माकडाला वेळेवरच मुर्तीजापुर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले होते यावेळी पशुवैद्यकीय डॉक्टरांनी या जखमी माकडाचा उपचार केला होता तसेच या जखमी माकडाची माहिती वन विभागालाही देण्यात आली होती.

 वन विभागाला माहिती मिळतात त्यांनी मुर्तीजापुर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये दाखल झाले होते यावेळी मा चंडिका आपत्कालीन पथका चे सदस्य विजय मालटे आणि त्यांच्या सहकार्यांनी या जखमी मालकाला वनविभागाच्या स्वाधीन केले होते तसेच वन विभागाने या कार्याबद्दल मा चंडिका आपत्कालीन पथकाचे आभार मानून कौतुक केले आहे तसेच या जखमी माकडाची परिस्थिती योग्यरीत्या सुदृढ झाल्या वर त्याला वन परीक्षक क्षेत्रात सोडण्यात येण्या ची माहिती वन विभागाकडून दिल्या गेली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!