Sunday, June 16, 2024
Homeताज्या घडामोडीआरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक; या दिवशी 'महाराष्ट्र बंद'ची हाक

आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक; या दिवशी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १२ फेब्रुवारी २०२४:- आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत, त्यातच आता सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.

14 तारखेला शांततेमध्ये महाराष्ट्र बंद पाळा, असं आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आलं आहे.
सकल मराठा समाजाकडून येत्या 14 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबईतल्या जरांगे पाटलांच्या आंदोलनात राज्य सरकरानं मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या असून त्याचं परिपत्रकही राज्य सरकारनं काढलं. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत, त्यामुळे या कायद्याची तात्काळ अंमलबजाणी व्हावी यासाठी येत्या 14 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. ते मेसेजेसही सोशल मीडियावर सकल मराठा समाजाने व्हायरल केले आहेत.

कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी तसंच सगेसोयरेंचा अध्यादेश काढण्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करण्यासाठी निघाले होते, पण त्यांना मुंबईच्या वेशीवर थांबवण्यात राज्य सरकारला यश आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत जाऊन जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्याचं सांगत त्यांना सरकारचा जीआर दिला. या जीआरची अंमलबजाणी होत नसल्यामुळे सकल मराठा समाजाकडून 14 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!