Monday, September 16, 2024
Homeब्रेकिंगडाबरचा हनी ट्रॅप ब्रँडेड मधात कॅन्सरवालं केमिकल

डाबरचा हनी ट्रॅप ब्रँडेड मधात कॅन्सरवालं केमिकल

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ :-सर्वात शुद्ध, शून्य भेसळ असणारं मध आमचंच, असा दावा अनेक कंपन्यांकडून करण्यात येतोय. मात्र खरंच हे मध शुद्धतेच्या कसोटीत किती खरं उतरतं? याचाच पर्दाफाश आज आम्ही केला.डाबरचं मध हे बाजारात सर्वात जास्त विकलं जाणारं मध आहे. त्यासाठी आम्ही मधाचे दोन नमुने घेतले. यामधील एक सॅम्पल डाबरच्या मधाचं होतं. यातलं मध हे कोणत्या ब्रँडचं आहे हे न कळण्यासाठीच दोन्ही बरणीतलं सॅम्पल लॅबमध्ये पाठवताना वेगवेगळ्या बरणीत भरण्यात आलं. याची तपासणी करण्यासाठी गुरुग्रामच्या फेअरलॅब्समध्ये हे सॅम्पल पाठवण्यात आलं.

मात्र आठवडा झाल्यावर या लॅबने टेस्ट होऊ शकणार नसल्याचा मेल पाठवला. मशिनचा पार्ट तुटल्याचं कारण त्यांनी पुढे केलं. त्यानंतर आम्ही हे सॅम्पल गुजरातमधल्या आनंदमध्ये असणाऱ्या National Dairy Development Board च्या लॅबमध्ये पाठवलं.मधाच्या तीन सॅम्पलचे निकाल आले होते. मात्र दोन सॅम्पल यात नापास झाले. कारण यात केमिकल कंपाऊंड Hydroxy-methyl-furfural म्हणजेच HMF आढळलं. HMF आरोग्यासाठी घातक आहे. कारण हे कंपाऊंड गोड वस्तूंमध्ये आढळतं.

HMF एक Organic Compound आहे जे गोड वस्तूंमध्ये असतं
शुद्ध आणि ताज्या मधामध्ये HMF ची मात्रा प्रति किलो 15 मिलीग्रॅमपर्यंत असते
आंतरराष्ट्रीय मानकांनुसार HMF ची मात्रा प्रति किलो 40 मिलिग्रॅमपेक्षा जास्त नसावी
तर उष्ण प्रदेशांमध्ये हीच मात्रा 80 मिलिग्रॅमपेक्षा कमी असावी लागते
आम्ही डाबरच्या ज्या सॅम्पलची तपासणी केली त्यात HMF ची मात्रा 176.57 मिलिग्रॅम आढळली, जी मोठ्या प्रमाणात आहे. अमेरिकेच्या National Centre For Bio-Technology Information ने याची कारणं स्पष्ट केलेली आहेत.

मधात HMF चं प्रमाण जास्त वाढतं?
जेव्हा मध खूप जुनं असतं
प्रक्रिया करताना जेव्हा मध जास्त तापवलं जातं
मधामध्ये आर्द्रता खूप जास्त असते
मध योग्यरित्या साठवलं गेलं नसेल तर
मधामध्ये साखरेचा पाक मिसळला असल्यास
किंवा मध धातूच्या कंटेनरमध्ये साठवला असल्यास
डाबरच्या मधामध्ये HMF Compoundचं प्रमाण जास्त आढळलं.
याचाच अर्थ डाबरचं मध अजिबात शुद्ध नाहीये.

तज्ज्ञ काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पॅकेजिंग आणि मोठमोठे दावे करणा-या कंपनीच्या मधातही भेसळ असू शकते. हे तुमच्या जीवालाही घातक आहे. कारण HMF Compound चं प्रमाण जास्त असल्यास तुम्हाला कॅन्सरचा धोकाही संभवतो.

डाबरच्या मधात गोड विष?
एखादी व्यक्ती रोज 30 ते 150 मिलिग्रॅम HMF ची मात्रा पचवू शकते
मात्र यापेक्षा जास्त सेवन केल्यास कॅन्सरचा धोका होऊ शकतो
आतडी, यकृत आणि किडनीला सर्वात जास्त धोका होऊ शकतो
HMF मुळे निरोगी पेशींचं रुपांतर ट्युमर पेशींमध्ये होऊ शकतं
HMF मुळे मनुष्याच्या डीएनएमध्ये बदल होऊ शकतो

शुद्धतेचा दावा करणा-या या कंपन्यांच्या मधाचं वारंवार सेवन केल्यास ते तुम्हाला आजारी पाडू शकतं. आपल्या देशात डाबरसारखे मोठे ब्रँडही शुद्ध मधाचा दावा करून भेसळयुक्त मध विकतायत. आणि याचे एक मुख्य कारण म्हणजे पुरेशी प्रभावी नसणारी गुणवत्ता तपासणारी यंत्रणा. सामाजिक संस्था Centre For Science And Environment अर्थातच CSE च्या दाव्यानुसार,

डाबरसह 13 आघाडीच्या ब्रँडच्या मधात साखरेचा पाक असल्याचं आढळलं
मधातल्या 77 टक्के नमुन्यांमध्ये साखरेच्या पाकातही भेसळ असल्याचं सिद्ध झालं
डाबर, पतंजली, बैद्यनाथ, झंडू, हितकरी या प्रमुख ब्रँड्सचे मधाचे नमुने चाचणीत अयशस्वी ठरले
CSE ने तीन वर्षांआधीच डाबरच्या मधात भेसळ असल्याचा खुलासा केला होता. मात्र तेव्हा डाबरने त्याचं खंडन केलं होतं. आता तीन वर्षानंतर झी मीडियानेही डाबरच्या मधात भेसळ असल्याचं सत्य सर्वांसमोर आणलंय. आता डाबर यावेळी काय उत्तर देतं हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp